Close Visit Mhshetkari

MP Land record : आता फक्त गट नंबर टाकून मोबाईल वर डाऊनलोड करा; आपल्या प्लॉट घर आणि जमिनीचा नकाशा

MP Land Record : शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतजमिनीचे अनेक कागदपत्रे लागते असतात. बऱ्याच वेळा जमीनीच्या भुनकाशाचे नेहमी काम पडत असते, तर मित्रांनो शेतीचा हा नकाशा ऑनलाईन पद्धतीने फक्त गट नंबर टाकून पाहता येतो आणि तो ही संपूर्ण मोफत पद्धतीने म्हणजे नकाशा पाहण्यासाठी पैसे जात नाहीत. चला तर पाहूयात सविस्तर माहिती.

Online bhunakasha download

आतापर्यंत तुम्ही सातबारा किंवा फेरफार काढले असतील, पण आता जमिनीचे जवळपास सर्वच कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध आहेत.आपल्या प्लॉट किंवा जमिनीचा नकाशा म्हणजेच भू – नकाशा काढता येणार आहे.

भू – नकाशा म्हणजेच जमीन नकाशा होय. जसे कि देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉटला ही सीमा असते भु – नकाशा मध्ये दिलेली असते.

भूमि अभिलेख नकाशा मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. ह्या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.

How to Download Maha Bhu Naksha

भू नकाशा कसा काढायचा?

सर्वात आधी आपल्याला bhunaksha.mahabhumi.gov.in या वेबसाइटला भेट द्यायची आहे.

वेबसाइटवर गेल्यावर, आपल्याला खालील माहिती भरावी लागेल:

  • राज्य: मध्य प्रदेश
  • विभाग: ज्या विभागात आपली जमीन आहे ते विभाग
  • जिल्हा: ज्या जिल्ह्यात आपली जमीन आहे ते जिल्हा
  • तालुका: ज्या तालुक्यात आपली जमीन आहे ते तालुका
  • गाव: ज्या गावात आपली जमीन आहे ते गाव
हे पण पहा --  MP Land records : घर-जमीन भाड्याने दिली आहे का? ‘या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या जागेवर हक्क ..

या सर्व माहिती भरल्यानंतर, “Search by Plot Number” वर क्लिक करा.

आपल्याला आपल्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक द्यावा लागेल. गट क्रमांक द्यायला विसरू नका.

गट क्रमांक दिल्यानंतर, “Search” वर क्लिक करा.

आपल्या जमिनीचा भू नकाशा आपल्या समोर दिसेल.

आपण भू नकाशाचा आकार बदलू शकता, तसेच तुम्ही भू नकाशावरील खुणा देखील पाहू शकता.

भू नकाशा डाऊनलोड कसा करावा?

भू नकाशा डाऊनलोड करण्यासाठी, आपल्याला “Map Report” वर क्लिक करावे लागेल.

“Map Report” वर क्लिक केल्यानंतर, आपल्या जमिनीचा भू नकाशा आपल्या संगणकावर डाऊनलोड होईल.

भू नकाशाच्या खुणा

  • भू नकाशावर खालील खुणा दिसतात
  • लाल खुण: ही खुण सार्वजनिक मालकीच्या जमिनीचे प्रतिनिधित्व करते.
  • निळी खुण ही खुण शासकीय मालकीच्या जमिनीचे प्रतिनिधित्व करते.
  • हिरवी खुण: ही खुण खासगी मालकीच्या जमिनीचे प्रतिनिधित्व करते.
  • काळी खुण ही खुण नदी, तलाव, नाले इत्यादी जलाशयांचे प्रतिनिधित्व करते.
  • पिवळी खुण: ही खुण रस्ते, रेल्वे, विमानतळ इत्यादी पायाभूत सुविधांचे प्रतिनिधित्व करते.

भू नकाशा हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे दस्तऐवज जमिनीच्या मालकीची खात्री करण्यास मदत करते. भू नकाशा आपल्याला आपल्या जमिनीची सीमा ओळखण्यास देखील मदत करतो.

Leave a Comment