Marathwada Liberation Day : दरवर्षी 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) म्हणून साजरा केला जातो.15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, त्यावेळी भारतातील जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर भारतात विलीन झाले नव्हते.हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर सहाजिकच,भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता.तो संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते.भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या निजामाने आत्मसमर्पण केले आणि हैदराबाद भारतात विलीन झाले.
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यातील लोक स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
भारताच्या पोलिसी कारवाईनंतर 17 सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलनीकरण भारतात करण्यात आले.यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्याला 15 ऑगस्टऐवजी 17 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले.मराठवाड्याची पार्श्वभूमी आणि इतिहास स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता.भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
Marathwada Mukti Sangram Din
स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली.निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता.तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता.निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता.
Marathavada Mukti Sangram in marathi
मराठवाडा मुक्ती संग्राम लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू,रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले. भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता.सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवलेल्या प्रस्तावाकडे निजामाने आणि कासीम रझवी याने पूर्णपणे दुर्लक्ष केले.
त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केले.याला उत्तर म्हणून भारतीय फौजांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार 13 सप्टेंबर 1947 रोजी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ला सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले.हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणागती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला.