Close Visit Mhshetkari

Mahavitan Bharati : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत तब्बल ५३४७ पदाची भरती! पहा सविस्तर माहिती व लगेच येथे अर्ज …

Mahavitan Bharati : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट – ४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

महावितरण भरती २०२४

“विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.

शैक्षणिक अर्हता :-

अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि

आ) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र,

वयोमर्यादा :-

  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे.(५ वर्ष शिथिलक्षम)
  • दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहोल.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वषांची राहील.
  • महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.

अर्ज करण्याची पध्दत

उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावरुन डाऊनलोड करु शकतात.यासोबत दिलेल्या लिंकवर ऑन लाईन अर्ज मरण्याचायतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.याकरीता उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (valid) स्वतःथा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑन लाईन अजामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिये दरम्यान नादणी केलेला सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैध कार्यरत राहणे आवश्यक आहे. ऑन लाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अहंता इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.

हे पण पहा --  MSEB requirements : महावितरणमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज !

विहित नमुन्यातील ऑन लाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत सविस्तर निवेदन सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. सबब, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे.उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जातील, अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची विशेष नोंद घ्यावी.

मानधन :-

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.

अ) प्रथम वर्ष एकूण मानधन रुपये १५,०००/-

ब) द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-

क) तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये १७,०००/-

उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी,आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल.भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.

“विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०० ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.

परीक्षा शुल्क

  • उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. २५०+ GST रु.
  • मागासवगीय,आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी १२५ + GST

उमेवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क Credit Card/ Debit Card Internet Banking द्वारे भरावयाचे आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.उमेदवारांना ऑन लाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते “ना परतावा” राहील.

महत्वाच्या तारखा :-

ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL.Link कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये प्रसिध्द करण्यात येईल.त्यासोबत ऑन लाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी (Online Exam) सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येईल.

महावितरण भरती सविस्तर माहिती व जाहिरात येथे पहा

महावितरण भरती

Leave a Comment