Close Visit Mhshetkari

Maharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे शासन निर्णय! शेतकरी,नोकरदार त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा

Maharashtra cabinet : महाराष्ट्रातील शेतकरी नोकरदार वर्ग त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित झालेल्या असून यामध्ये खूप सारी तरतूद करण्यात आलेली आहे तर बघूया आजच्या या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे शासन निर्णय आणि तरतुदी कोणत्या आहेत त्या सविस्तर

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

  • राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य.नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी – सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार
  • दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता देण्यात आली.
  • नागपूर येथील मे. शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार आहे.
  • सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यात येणार आहे. 
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्यात आला.
  • नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र सुरू होणार आहे. 
  • मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे करण्यात आली.
हे पण पहा --  Government employees : कर्मचाऱ्यांचे अर्जित रजेचे रोखीकरण संदर्भात नवीन शासन निर्णय!

Leave a Comment