Magel Tyala Vihir : शेतकरी सिंचन विहीर अनुदान योजना सुरु झाली असून लवकरच शेतकरी बांधवाना रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मिळणार आहे.याच्या संदर्भातील नवीन शासन निर्णय या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना या राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे. अर्ज कसा करायचा,अनुदान,लाभार्थ्या निवड,पात्रता या संबंधात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Magel Tyala Vihir Yojana
मागेल त्याला विहीर योजना संदर्भात दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीतील पाणी उपसा उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवाना पंप शक्यतो सोलर पंप देण्यात यावा असा देखील उल्लेख शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.
कृषी पंपसोबत तुषार ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अस्तित्वातील विहिरीपासून ५०० मीटर अंतरावर विहीर खोदण्याच्या नियमात देखल बदल करण्यात आला असून आता १५० मीटर करण्यात आलेली आहे.परंतु हा नियम ठराविक बाबींसाठीच लागू असणार आहे.
विहीर अनुदान योजना पात्रता
- लाभार्थी शेतकऱ्याकडे सातबाऱ्यावरती विहीर नमूद नसावी.
- लाभार्थ्यांना जॉब कार्डधारक असला पाहिजे.
- किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग क्षेत्राचा दाखला असणे आवश्यक असावे.
- लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
- लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
Vihir Anudan Yojana Documents
मागेल त्याला विहीर अनुदान योजना अर्जासोबत लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
- ऑनलाईन ७/१२ उतारा
- ऑनलाईन ८ अ म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला
- जॉब कार्ड
- एखाद्या विहीर असेल परंतु ती जर सामुदायिक असेल तर अशावेळी सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र.