Lumpy virus : कोविड 19 संसर्ग,मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या समस्यांना तोंड देत असताना लम्पी त्वचा रोग हा चिंतेचा विषय बनला आहे.लम्पी व्हायरसचा संसर्ग गायीच्या जीवनासाठी धोकादायक आहे.
What is Lumpy skin disease virus
लंपी व्हायरस 2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती.लंपी त्वचाचा रोग असून असे सांगितले जाते आहे,की हा आजार मच्छर चावल्या मुळे होतो.लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे.हा रोग कीटकांपासून पसरतो.माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो.यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्रणयनांना याचा सर्वाधिक धोका आहे.’What is Lumpy skin disease virus’
लंपी आजाराची लक्षणे
‘लंपी आजाराची लक्षणे’ खालील प्रमाणे आहेत.
>> लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो.
>> जनावरांचे वजन कमी होते.
>> जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते
>> जनावरांच्या तोंडातून लाळ पडते.
>> जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो.
>> जनावर दूध कमी देते,यामुळे जनावरांची तब्येत जास्त खराब होते.
Lumpy Virus Effect on Cow Milk
लम्पी व्हायरस चा संसर्ग गायीच्या जीवनासाठी धोकादायक आहे.यासोबतच गाईचे दूध आणि गोमूत्र आणि शेणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.या संदर्भात आज तक न्यूज चॅनेलने लखनऊ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ञ अरविंद कुमार वर्मा यांच्याशी चर्चा केली असता गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा प्रभाव दिसून येतो आणि दुधातही विषाणूचे घटक आढळतात असे स्पष्ट झाले आहे.यासोबतच गाईचे दूध आणि गोमूत्र आणि शेणावरही त्याचा परिणाम दिसून येत असल्याचे समोर आले आहे.
लंपी विषाणू – जनावरांची काळजी कशी घ्याल ?
– गोठ्यात माशा,डास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
– जनावरांवर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावा.
– जनावऱ्यांच्या गोठ्यात स्वच्छता राखावी.
– निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे ठेवावे.
– आजारी जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
– गायी आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे.