Lumpy virus : कोविड 19 संसर्ग,मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या समस्यांना तोंड देत असताना लम्पी त्वचा रोग हा चिंतेचा विषय बनला आहे.देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे.या आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे.देशात अनेक राज्यांमध्ये लंपी स्कीनचा कहर वाढत चालला आहे.
Lumpy virus |
लम्पी त्वचा रोग काय आहे? (what is Lumpy skin disease virus)
युरोपीयन अन्न सुरक्षितता प्राधिकरण अर्थात EFSA ने दिलेल्या माहितीनुसार,लम्पी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य रोग असून,तो जनावरांना होतो.एलएसडी हा लम्पी स्किन डिसीज व्हायरसमुळे होतो.हा पॉक्सिव्हिरिडी कुळातला कॅप्रीपॉक्सव्हायरस आहे,अशी माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ अर्थात WOAH ने दिली आहे.”लम्पी त्वचा रोग काय आहे?
लंपी व्हायरस 2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती.लंपी त्वचाचा रोग असून असे सांगितले जाते आहे,की हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो.लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे.हा रोग कीटकांपासून पसरतो.माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो.यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्रणयनांना याचा सर्वाधिक धोका आहे.
लम्पी आजाराची लक्षणे
>> लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो.
>> जनावरांचे वजन कमी होते.
>> जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते
>> जनावरांच्या तोंडातून लाळ पडते.
>> जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो.
>> जनावर दूध कमी देते,यामुळे जनावरांची तब्येत जास्त खराब होते.
Lumpy Skin Disease In Humans
लम्पी त्वचा रोग मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.लम्पी त्वचा रोग भारतात वेगाने पसरत असला तरी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी पुष्टी केली आहे की,लम्पी त्वचा रोग मानवामध्ये पसरत नाही. जर हा आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असल्यासही मानवामध्ये हे संक्रमण Lumpy Skin Disease In Humans होत नाही.लम्पी त्वचा रोगामुळे मृत्यू दर 1 ते 2 टक्के आहे.
लम्पी विषाणू – जनावरांची काय काळजी घ्याल?
– गोठ्यात माशा,डास होणार नाही याची काळजी घ्यावी.
– जनावरांवर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावे.
– गोठ्यात स्वच्छता राखावी.
– निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे.
– बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
– गायी आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे.