Close Visit Mhshetkari

Loan Waiver : 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दुसरी – तिसरी याद्या आल्या ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

Loan Waiver :  जे शेतकरी नियमित  कृषीकर्ज (Agriculture loan) परतफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान दुसरी व तिसरी यादी प्रसिद्ध झाल्या आहेत.

Debt forgiveness subsidy

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये (loan waiver) देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून याच्या याद्या बँकेत जमा झाल्या आहेत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होतील यासाठी तब्बल 4 हजार 700 कोटी रुपयांचा निधी खर्च अपक्षेत असून महाराष्ट्र सरकारने मंजुरी देखील दिली आहे.

50 हजार प्रोत्साहन अनुदान अपात्र शेतकरी

1. आजी व माजी मंत्री तसेच आमदार आणि खासदार

2. केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी (मासिक 25 हजार पेक्षा जास्त पगार असणारे)

3. महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त पगार असणारे)

हे पण पहा --  Agriculture News : आता 'या' जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांना पण मिळणार 13 हजार ते 36 हजार मदत,पहा शासन निर्णय

4. सहकारी कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती सहकारी संघ, नागरी सहकारी बँका,सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी व कर्मचारी

5. 25 हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या शेतकरी

6. शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणारे शेतकरी

Debt forgiveness लाभार्थी यादी

Debt forgiveness subsidy साठी पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या ज्या त्या बँकेमध्ये सादर झालेल्या आहेत लवकरच या याद्या शेतकऱ्यांना पाहण्यासाठी पोर्टलवर येतील.पैसे( crop insurance) कधी जमा होणार याबाबत बॅंक अधिकारी यांच्या दाव्यानुसार लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल.

 बँक खात्यामध्ये 50 हजार रुपये येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक (Aadhaar link) असणे आवश्यक आहे.ऑनलाईन पद्धतीने सदरील अनुदान कर्ज खात्यात जमा केले जाऊ शकते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

1 thought on “Loan Waiver : 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दुसरी – तिसरी याद्या आल्या ‘या’ दिवशी जमा होणार पैसे”

Leave a Comment