Land records : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. असून सातबारा आठ अ उताऱ्याबाबत तलाठी कार्यालयामध्ये अनेकांना हेलपाटी मारावी लागत असतात .
त्यामुळे त्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वेळही वाया जातो. आणि हेलपाटे मारणे बंद होईल .व वेळ व पैसा देखील वाचेल काय निर्णय आहे. हे आपण ह्या लेखांमध्ये बघुयात
Satbara Eight-A Utara
तर मित्रांनो सातबारा आठ अ उतारा काढण्यासाठी तुम्हाला आता तलाठी कार्यालयामध्ये वेळ घालवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 25 रुपयात महा-ई-सेवा केंद्रात एका क्लिकवर सातबारा तसेच आठ अ चा उतारा काढता येईल.महा ई-सेवा’, ‘सेतू’; तसेच ‘आपले सरकार’ या पोर्टलवर हा महत्त्वाचा दस्तऐवज उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे तुम्हा सर्वांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
नागरिकांना जमीन विषयक सर्वच कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयातील तलाठ्याकडे येराझरा मारावा लागतात. आणि तलाठी मात्र विविध कामानिमित्त कार्यालय कार्यालया बाहेर असतात अशा वेळेस तुम्हाला तलाठ्यांची वाट पहावी लागते.
अशातूनच तलाठ्यांकडून वेळेत काम होत नसल्याचा तक्रारी समोर येतात त्यामुळे महसूल विभागाच्या सेवा लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने फेरफार विषयक सेवा आता महा-ई-सेवा सेतू तसेच आपले सरकार यासारख्या केंद्रामधून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मिळणार ‘आठ अ’ उताराही २५ रुपयांत
सरकारने नागरिकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी सातबारा आठ सारखा दैनंदिन कामकाजात लागणारा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसणार आहे. आता तुम्हाला फक्त अवघ्या 25 रुपयात महा-ई-सेवा केंद्रावर सातबारा , ‘आठ अ’ उतारा मिळणार आहे. सामान्यांची कामे मार्गी लागण्यासाठी सरकारने हा आगामी निर्णय घेतला आहे.
नागरिकांची परेशानी होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. दैनंदिन कामे मार्गी लागावेत हा या मागचा हेतू आहे यामुळे सामान्य लोक परेशान होऊ नये.