Close Visit Mhshetkari

land record नवीन शेत रस्त्यासाठी कसा आणि कुठे करावा अर्ज

Land record : ग्रामीण भागात शेतीसाठी रस्ता खुप महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यावर ग्रामीण भागात जोर दिला जात आहे.तसेच शेतीची विभागणी होते आहे आणि तस-तशी रस्त्याची गरज भासू लागली आहे. शेती साठी रस्त्या हवा असल्यास अर्ज कुठे आणि कसा करायचा यासंदर्भातील सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.

Land record
Land record

शेत रस्ता

एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या स्वत:च्या शेतजमिनीमध्ये प्रवेश करण्यासाठी रस्ता नसल्यास,तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 च्या कलम 143 अंतर्गत नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज करू शकतो. हा शेत रस्ता जवळच्या शेतकऱ्यांच्या बांधावरून दिला जातो.

1. अर्जदाराच्या आणि शेजारच्या ज्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी करायची आहे अशा दोन्ही जमिनींचा कच्चा नकाशा

2. अर्जदाराच्या तीन महिन्याच्या आतील जमिनीचा सातबारा

3. शेजारच्या शेतकऱ्यांची नावे,पत्ता आणि त्यांच्या जमिनीचा तपशील

.4. अर्जदाराच्या जमिनीचा काही कोर्टामध्ये वाद चालू असल्यास त्याचे संपूर्ण कागदपत्रे.

शेत रस्त्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी

>> शेतकऱ्याने अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावर रस्त्याची मागणी केली असे दोघांनाही नोटीस येतात आणि त्यांना त्यांच म्हणण मांडण्याची संधी दिली जाते.

>> अर्ज केलेल्या शेतकऱ्याला खरंच रस्त्याची गरज आहे की नाही हे तहसीलदारांकडून तपासले जाते.

>> तपासणी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार या अर्जावर निर्णय देतात.अर्ज स्विकारल्या जातात किंवा फेटाळला जातो.

>> अर्ज स्वीकारला गेल्यास शेजारच्या बांधावरून रस्ता देण्याचे आदेश दिले जातात. अशा वेळी शेजारच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते.

>> साधारणपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजे एका वेळेस एकच बैलगाडी त्या रस्त्यावर जाऊ शकेल.

>>तहसीलदारांना दिलेल्या निर्णयावर हरकत घ्यायची असल्यास, दोन महिन्याच्या (60 दिवस) आत घेता येते.त्याच्यासाठी आपण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालय मध्ये दावा करू शकतो.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment