Close Visit Mhshetkari

Kapus Bhav : ‘पांढरे सोन’आणखी महागणार

Kapus Bhav Today कापसाचे बाजार भाव गेल्या दिवसात तुमच्यापासून लपून राहिलेले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार तेजीत असून आता ते जवळपास स्थिर झाला आहे. पण तुमच्यापैकी अनेक बांधवांना कापसाचे पुढे काय होणार हे जाणून घेण्याची खूप ईच्छा असेल. तर मित्रांनो, या लेखामध्ये आपण कापसाच्या भविष्याबाबत तज्ज्ञ आणि तज्ज्ञांचे मत काय आहे याची माहिती सांगणार आहोत.

Kapus Bhav 2022
Kapus  Bhav 2022

 

Kapus Bhav

• कापसाची किती आवक शिल्लक?

       सध्यस्थितीत शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.या हंगामातील सुमारे 80% कापूस बाजारात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु आता ही बाब उरलेल्या मालाच्या 20% इतक्या कापसासाठी आहे.शेतकऱ्यांच्या घरातून बाहेर काढून बाजारात आणण्यासाठी व्यापारी आणि निर्यातदारांकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत.

• कापसाला विक्रमी दर का मिळाला

यावर्षी खरिपात कापसाचे क्षेत्र तर घटलेच होते शिवाय अवकाळी पावसामुळे कापासाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बोंड अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बोंड वाढीवर त्याचा परिणाम झाला होता.तसेच ढगाळ वातावरणामुळे दिवसेंदिवस बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने उत्पादनात मोठी घट झालेली आहे. कापूस अंतिम टप्प्यात असताना झालेला अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम कापसावर झाला होता.परिणामी यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट झालेली आहे.

• वस्रोद्योग लॉबीच्या दबावाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष

मधल्या काळात कापसाच्या या वाढत्या दराबाबत वस्त्र उद्योगामध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण पसरले होते.त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग लॉबीने कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केलेली होती.वस्त्रोद्योग लॉबीने दर कमी करण्यासाठी निर्यात बंद करावी तसेच आयात शुल्क कमी करावी अश्या मागण्या केल्या आहेत.केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. पण केंद्र सरकारकडून अजून पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना मिळालेला नाही.

• कापूस बाजार भावात तेजीचा अहवाल

    येत्या काळात कापूस बाजार भावात पून्हा वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.आगामी काळात कापसाच्या बाजार भावात अधिक तेजी का येऊ शकते याची 3 आपण कारणे पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की कापसाचे भाव वाढणार.

• कापसाच्या तेजीची 4 कारणे

•कापसाचे उत्पादन घटले

1. कमी उत्पादन यावर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार,यावेळी 145861 हेक्टरवर कापसाची पेरणी झाली.अंदाजानुसार देशभरात यंदा 320 ते 325 लाख गाठीच उत्पादन निघण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गतवर्षी हेच उत्पादन 350 ते 375 लाख गाठींपर्यंत होते. 40 ते 50 लाख गाठींच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

हे पण पहा --  Cotton farming यावर्षी कसे असतील कापूस बाजार भाव ? भाव वाढण्याचे कारणे काय आणि केव्हा विकावा कापूस पहा सविस्तर माहिती

• जागतिक बाजारात कापसाला उच्च मागणी

2- चीन आणि बांगलादेश हे भारतातून कापूस आयात करणारे प्रमुख देश आहेत.भारतात 370 ते 390 लाख मेट्रिक टन कापसाच्या गाठींचे उत्पादन होते.यावर्षी केवळ 290 ते 300 लाख मेट्रिक टन गाठींचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे मागणीचा पुरवठा करणे देखील कठीण होत आहे. दिवाळीनंतर आयात शुल्क कमी करणे आणि निर्यात बंदी होईल ही अफवा पसरली आणि भाव आणखी कमी झाले होते नंतर वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भाव वाढले होते. भाव वाढणार असी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण चीन, अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेशातील घटलेले कापूस उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे भारतीय कापसाच्या पिकासाठी सोन्याचे दिवस येणार हे नक्की आहे.

• भारतातील जुना स्टॉक संपला आहे

3) कापसाचे उत्पादन  नैसर्गिकरित्या कमी झाले.त्यामुळे एकीकडे कापसाचे कारखाने साठेबाजी करत आहेत. बांगलादेश आणि चीनकडून मोठ्या प्रमाणावर दिसणारी आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर दबावही येत आहे.त्यामुळे दर झपाट्याने वाढत असून त्यात अजून सुध्दा अशाच प्रकारे वाढ होण्याची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

• रुईची मागणी वाढली

4) आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात रुईची मागणी अचानक वाढली असून जुना साठा आता जवळपास संपत आला आहे.सुतगिरण्यांनी सावध पवित्रा घेतला असून रुईची साठवणूक करण्यात सुरवात केली आहे.परिणामी आगामी काळात कापसाची मागणी वाढली असून भाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

आजचे कापूस बाजार भाव

आजचे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 

• भविष्यात काय अपेक्षित आहे

महू भविष्य अहवालानुसार कापूसचे भाव काही दिवसांत 10 हजारांच्या वर जाऊ शकतात.कापूस व्यावसायिक विश्वातील व्यापाऱ्यांचे असे मत आहे. इतिहासात प्रथमच कापूस/कापूसचा भाव 10 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. काही काळासाठी, किंमत स्थिर राहिली आहे परंतु वरील मुद्दे लक्षात घेता भविष्यात कापसाचे भाव वाढू शकतात.

• कापूस हमीभाव || Cotton MSP

       या हंगामात सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत 5925 रुपये आणि 6025 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.मात्र खुल्या बाजारात कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याने सरकारच्या CCI ला हमी भावात कापसाचे एक बोंड सुध्दा खरेदी करता आले नाही.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment