Kanda Chal Yojana : महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानि रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात.त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर नासतो आणि त्याचे नुकसान होते.तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो.
kanda chal anudan yojana |
कांदा चाळ अनुदान योजना
महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते.
आजमितीस भारतात सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली असून त्यापासून 74 लाख मे.टन उत्पादन मिळते. देशातील कांदा उत्पादनापैकी 26 ते 28 टक्के कांदा उत्पादन (24 लाख मे.टन) हे महाराष्ट्र राज्यात होते. मागील वर्षी देशातून निर्यात झालेल्या 9.44 लाख मे.टन कांद्यापैकी 7 लाख मे.टन कांदा हा महाराष्ट्रात उत्पादीत झालेल्या कांद्यापैकी होता. कांदा निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे.
Kanda Chal Anudan Yojana
यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता
कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.