Jyeshtha Gauri : महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात.महालक्ष्मी हे अतिशय जागृत दैवत आहे. ती समृद्धीची तसेच शौर्याची देवता मानली जाते. अशा या महालक्ष्मी देवतेचे व्रत आपल्या संस्कृतीत स्त्रिया आनंदाने व उत्साहाने करतात. या दिवशी स्त्रिया महालक्ष्मीचे मोठ्या उत्साहात पूजन करतात.
|
jyeshtha gauri pujan |
ज्येष्ठागौरी विधी
भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा
गौरी आवाहन होते.हा उत्सव तीन दिवस चालतो.यावेळी गौरींचे स्वागत गौरी आली, सोन्याच्या पावली गौरी आली,चांदीच्या पावली गौरी आली,गाई वासराच्या पावली गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली असे म्हणत करतात.पावला-पावलांनी गौरींना घरात आणले जाते.यावेळी नैवेद्यांचे विविध प्रकार रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.
शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी,कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे सुताच्या गाठी पाडतात .दिवशी सकाळी पोवत्याच्या वा . त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात. हळदीकुंकू,रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात.’
ज्येष्ठा गौरीची कहाणी
आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला.घरोघर लोकांनी गौरी आणल्या.रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या.घंटा वाज लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुले घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही.तुम्ही बापाजवळ जा,बाजारातले सामान आणायला सांगा.
सामान आणले म्हणजे गौर आणीन ! मुले तिथून उठली,बापाकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचे सामान आणा. म्हणजे आई गौर आणील ! बापाने घरात चौकशी केली.मुलांचा नाद ऐकला.मनांत फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबी पढे उपाय नाही.मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला.
देवाचा धावा केला.तळ्याच्या पाळी गेला.जीव द्यावा म्हणून निश्चय केला.अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली.जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली.तिने त्याची चाहूल ऐकली.कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला.चौकशी केली.पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारले.नवऱ्याने आजी म्हणून सांगितले.
बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली.तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली,सगळ्यांनी पोटभर खाल्ली.सगळी जण आनंदाने झोपली.
Jyeshtha Gauri Pujan Marathi Mahiti
सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली.मुला,मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटले देवाला कर.नाही काही म्हणू नको,रड काही गाऊ नको.ब्राह्मण तसाच उठला,घरात गेला बायकोला हाक मारली, अंग अगं, ऐकलंस का,आजीबाईला न्हाऊ घाल,असे सांगितले.आपण उठून भिक्षेला गेला.भिक्षा पुष्कळ मिळाली.सपाटून गूळ मिळाला.मग सगळे सामान आणले.ब्राह्मणाला आनंद झाला.बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
थोड्या वेळाने म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली.उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला,आजी आजी,दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली,तू काही काळजी करू नको.आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध.संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येती ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला.ब्राह्मणांने त्यांचं दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला,आजी आजी,तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झााले.आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल?म्हातारी म्हणाली,तू काही घाबरू नको.माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही.ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग ! गौरीने सांगितले, मी तुला येताना वाळू देईन,ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक,मडक्यांवर टाक,पेटीत टाक, गोठ्यात टाक.असे केलेस म्हणजे कधी कमी होणार नाही.ब्राह्मणाने बरं म्हटले.तिची पूजा केली.गौर आपली प्रसन्न झाली.
ज्येष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करण्यात यावी. त्यांची पूजा करावी.दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा.सवाष्णीची ओटी भरावी.जेवू घालावे.संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्ष सुख मिळेल.सतत,संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी,पिंपळाच्या पारी सुफळ संप्रुण (संपूर्ण) विशेष – प्रतिष्ठापनेच्या पहिल्या व दुस-या रात्री भांडी वाजवून तिला जागे राहण्याचे आवाहन केले जाते. तर विसर्जनाच्या दिवशी सुवासिनींना बोलावून गौरींसाठी दोरे घेतले जातात. यावेळी दो-यामध्ये तांदूळ, हराळी, खोबरे, विड्याचे पान, खारीक, फुल, हळद, कुंकु असे विविध सामग्री गाठीद्वारे बांधल्या जातात. अशा एका गौरीसाठी २० व २१ असे दोरे घेतले जातात. ते त्या दोघींच्या डोक्यावरती ते ठेवले जातात व आरतीने पूजेची सांगता होते. त्यानंतर गौरींचे विसर्जन केले जाते .
ज्येष्ठागौरी आरती (jyeshtha Gauri Aarti)
सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी देवीची आरती| सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली !
ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न होती ।। सोन्याच्या पावलाने ..
कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा ।
दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।। सोन्याच्या पावलाने ..
नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।धृ .२ || सोन्याच्या पावलाने …
भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला … सोहळा || धृ .३ || सोन्याच्या पावलाने …
रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।धृ .४ || सोन्याच्या पावलाने …..
Jyeshtha gauri katha in Marathi
धर्म शास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहेत. एकदा अस्वरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरी महालक्ष्मी कडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी त्याची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने अस्वरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतीला व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरी ची पूजा करू लागल्या.”ज्येष्ठा गौरी कथा (jyeshtha gauri katha in Marathi)”
टिप :- रील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.