Close Visit Mhshetkari

Jowar Market Price : ज्वारीने तोडले रेकॉर्ड ! 7 100 रुपये क्विंटल,  अजून पोहोचणार ज्वारीचे भाव गगनाला !

Jowar Market Price: नमस्कार मित्रांनो ज्वारीचे बाजार भाव या विषयी माहिती पाहणार आहोत ज्वारी हे पीक विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात मोठे प्रमाणावर घेतले जाते यावर्षी 

ज्वारीचे बाजार भाव वाढलेली असून अजून देखील वाटण्याची दाट शक्यता आहे यावर्षी तर तिच्या भावाने उच्चांक गाठला आहे. केवळ ज्वारीचे नव्हे तर गहू बाजरी देखील भावात मोठा वाढ झाली आहे. तर काय भाव आहेत ज्वारीचे हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यं

ज्वारी  बजार भाव काय आहे 

निसर्गाने पाठ फिरवलेली असल्याने आणि वातावरणातील खराबी या कारणांनी भुसार मालाकडे शेतकऱ्यांची पाठभुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ यामुळे यंदा विक्रमी वाढ धान्यांच्या भावात झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

निसर्गाचे पिकाविरुद्धचे वातावरण या कारणामुळे बाजारपेठेमध्ये होणारा चढ उतार आणि यातूनच मिळणारा शेतकऱ्यांच्या मालाला भाव हे एक वेगळेच असं गणित आहे देऊळगाव राजा येथील बाजारपेठे त ज्वारीला 7 हजार 100 एवढा भाव मिळाला आहे आणि अजून देखील ज्वारीचा भाव 8000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जालना येथे बाजार समितीमध्ये 7200  भाव मिळाला आहे.

उत्पन्नात मोठी घट

निसर्गाने साथ न दिल्यामुळे भुसार शेती उत्पन्नात मोठा फटका बसला असून तसेच मजुरी याला देखील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुसारमालाकडे पाठ फिरवत रोख रक्कम देणारी पिके घेण्याकडे आपला कल वाढवला पाहिजे.

त्यामुळे आगामी काळात धान्य टंचाईची तीव्रता अधिक वाढणार असल्याचे दिसते. वर्षभरापासून ज्वारी, बाजरी व गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. तर ऊस, कापूस, तूर, सोयाबीन या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.

वर्षाच्या तुलनेमध्ये येणाऱ्या काळात धान्य टंचाई अधिक वाढणार असल्याचे दिसून येते. वर्षभरामध्ये आपण पाहतच आहोत की ज्वारी बाजरी व गव्हाच्या मलात  मोठी घट झालेली आपल्याला दिसून येते तर ऊस कापूस तूर सोयाबीन या नगदी पिकावर देखील शेतकऱ्यांचा भर असला तरी यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

शेतकरी राब राब राबवत असल्याने तिच्या मेहनतीला अंत राहत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रतीचा भाव मिळावा अशी आशा करतो.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment