Close Visit Mhshetkari

Jantetun Sarpanch : जनतेतून सरपंचाची निवड पात्रता,कालावधी,अधिकार,अविश्वास आणि मानधन पहा सर्व माहिती

Jantetun Sarpanch : ग्रामीण भागात गावांचा विकास करण्याची जबाबदारी सरपंचावर असते. आता या सरपंच पदासाठी निवड ही थेट निवडणूक असणार आहे,म्हणजे जनतेतून होणार आहे.आता सरपंच आता गावातील जनता निवडणार आहे.आज आपण बघणार आहोत जनतेतून सरपंच पदासाठी पात्रता,कालावधी,मानधन,अधिकार,अविश्वास आणि राजीनामा संपूर्ण माहिती.

थेट जनतेतून सरपंच निवड पध्दत

सरपंच पदाची निवड ही दिनांक 27 जुलै 2022 रोजीच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम,2017 नुसार कलम 30 अ- १अ नुसार थेट जनतेतून असणार आहे.ग्रामपंचायतीच्या मूळ सदस्यांची संख्या,आहे तेवढीच राहणार व सरपंच हे पद अतिरिक्त असेल.

 सरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असून त्याचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी नसावे.ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले नसेल,तर ती व्यक्ती त्या गावाच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पात्र नसतात.

जनतेतून सरपंचाचा कालावधी

कलम 14 (एक) खंड (अ) मध्ये पाच वर्षा ऐवजी सहा वर्ष हा जनतेतून सरपंच कालावधी असेल,(दोन) खंड (ड) मध्ये पाच वर्षा ऐवजी सहा वर्षे हा मजकूर दाखल करण्यात आला आहे. (कलम १४ ची अपात्रता ५ ऐवजी ६ वर्षे करण्यात आली आहे.)

जनतेतून निवडलेल्या सरपंचाचे अधिकार

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,1959 मधील कलम 33 सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकीची कार्यपध्दती विषद करण्यात आलेली आहे.त्याअनुषंगाने उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.उपसरपंचा पदाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे आणि उपसरपंच यांची निवड करणे कायद्याने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान सरपंच भुसवत असतो.

हे पण पहा --  Sarpanch salary news : सरपंच उपसरपंच मानधन वाढले, पहा नवीन शासन निर्णय

सरपंच व उपसरपंच मानधन | Sarpanch Honorarium In Maharashtra

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो.ग्रामपंचायतीच्या प्रमूख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी असते.सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत.ग्रामपंचायतीच्या कामांचा भार देखील वाढला आहे.काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच संघटना,संस्था व लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी सरपंच मानधन/सरपंच पगार (Sarpanch Mandhan) वाढीसाठी शासनाकडे सतत मागणी होत असताना दिसते.
ग्रामपंचायतीच्या  माध्यमातून लोकमत निहाय ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन्याला 3000 रुपयापासून 5000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.शिवाय उपसरपंचांना आता लोकसंख्येनुसार 1000 ते 2000 रुपये मानधन मिळणार आहे.कारण विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो.

जनतेतून सरपंच अविश्वास ठराव

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच पदासाठीच्या अविश्वासाच्या तरतुदी मध्ये अविश्वास ठराव सादर करणेसाठी ग्रामसभेत दोन तृतीयांश अशी सुधारणा करणेत आली आहे. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडीपासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीची मुदत संपण्यासाठी सहा महीने बाकी राहीले असतील तर असा कोणताही अविश्वास ठराव आणता येणार नाही.अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यास पुन्हा दोन वर्षाच्या कालावधीत अविश्वास ठराव आणता येणार नाही.

जनतेतून सरपंचाचा राजीनामा

कलम 29 पोटकलम (2) मध्ये सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा झाल्यास सात दिवसांच्या आत सचिवाकडे अग्रेषित करील. म्हणजे सरपंचाला सदस्याचा राजीनामा सात दिवसांपेक्षा अधिक काळ स्वत:कडे ठेवता येणार नाही.तसेच सभापती हे सरपंचाचा राजीनामा त्यांच्याकडे आल्यास तो सात दिवसात संबंधीत ग्रामपंचायतीच्या सचिवाकडे अग्रेषित करण्याची व्यवस्था करतील.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment