Close Visit Mhshetkari

सावधान…अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेत असाल तर डोक्याला होईल ताप Instant Loan

Instant Loan : सध्या डिजिटलचा जमान्यात झटपट कर्ज देण्यासाठी काही अ‍ॅप आमिष दाखवतात.अनेक जण बँकेची कटकट नको आणि डोक्याला ताप नको म्हणून अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेत असतात. मात्र,असे कर्ज घेणे आता डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले आहे.

Personal loan app
Personal loan app

Modus Operandi Instant Loan Apps

तुम्हाला झटपट कर्ज कंपन्यांची मोडस ऑपरेंडी समजावयाची झाली तर ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रथम काही हजार रुपयांचे कर्ज दिले जाते,नंतर त्याला आणखी रक्कम देण्याच्या नवीन ऑफर दिल्या जातात आणि नंतर काही आठवड्यांत त्या व्यक्तीला कर्ज घेतलेल्या रकमेच्या दुप्पट करून परतफेड करण्यास सांगितले जाते.

परतफेड करण्यास असमर्थता दर्शविण्याच्या मोडस ऑपरेंडी अंतर्गत,दुप्पट कर्जाची परतफेड करण्यासाठी आमच्या इतर अ‍ॅपवरून कर्ज घ्या,असे सांगितले जाते,हे करत असताना एखाद्या व्यक्तीला 50 लाखांच्या वर कर्ज मिळते.अशी ही डिजिटल खंडणीची नवी  मोडस ऑपरेंडी दिसून येत आहे.

Instant Personal loan Apps

असाच एक प्रकार समोर आला आहे.अ‍ॅपच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांचे घेतले.मात्र, 90 लाख रुपये वसूल केले गेले आहे.पहिल्यांदा 30 हजारांच्या कर्जासाठी अर्ज केला पण फक्त 5 हजारांचे कर्ज मिळाले.त्यानंतर त्या व्यक्तीने आणखी कर्ज घेण्यासाठी 5 ते 6 वेळा अर्ज केला आणि व्यक्तीला सुमारे 30 हजारांचे कर्ज मिळाले जे व्यक्तीला 15 दिवसांत फेडायचे होते.

पंधरा दिवसांत त्याला इतर इन्स्टंट लोन कंपन्यांकडून कर्ज देण्यासाठी अनेक संदेश आले.त्याने लगेच कर्ज घ्यावे म्हणून अनेक जाहिराती येऊ लागल्या.त्या व्यक्तीने जास्त कर्ज घेण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच त्याने जवळपास 6 ते 7 लोन अ‍ॅप्सवरून सुमारे दीड लाखांचे कर्ज घेतले पण त्याला 20 ते 25 दिवसांत 3 लाख परत करण्यास सांगण्यात आले.त्यामुळे त्याने परत इन्स्टंट लोन अ‍ॅपवरून 3 लाख रुपये कर्ज घेऊन जुने कर्ज फेडले.त्यानंतर ही 3 लाखांची रक्कम 6 लाख 75 हजारांहून अधिक झाली.

Personal loan offers

 सुमारे 3 महिने हे चक्र असेच चालू राहिले आणि त्या व्यक्तीने जुने कर्ज नवीन कर्ज घेऊन फेडण्यास सुरुवात केली.त्यानंतर अचानक कर्ज अ‍ॅप्सने त्या व्यक्तीला नवीन कर्ज देण्यास नकार दिला आणि जुने कर्ज फेडण्याची मागणी केली.त्यावर इन्स्टंट लोन अ‍ॅप्सचे एकूण सुमारे 70 लाख रुपये कर्ज झाले होते.

अशा स्थितीत त्याने भीतीपोटी फोन उचलणे बंद केल्यावर प्रथम त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचे मेसेज पाठवण्यात आले आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना तो व्यक्ती बलात्कारी असल्याचे मेसेज,अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली.

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  किंवा साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment