Close Visit Mhshetkari

भारतीय नौदलाचा ध्वज आता छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित Indian Naval Ensign

Indian Naval Ensign : सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती, याचाच उल्लेख आणि स्मरण करत नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. “सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असे नौदल उभारले, ज्याने शत्रूंची झोप उडवली.शक्तीशाली आरमार उभे केले. शिवरायांपासूनच प्रेरणा घेत नौदलाच्या झेंड्यावरुन सेंट जॉर्जेस क्रॉस हटवून आता त्याजागी तिरंगा आणि नौदलाचं बोधचिन्ह दिसणार आहे.

Indian Navy Logo
Indian Navy Logo

Indian Naval Ensign

पंतप्रधानांच्या हस्ते नवीन नौदल चिन्हाचे ( Indian Naval Ensign ) अनावरण करण्यात आले.भारतीय नौदलाचे नवीन चिन्ह आता छत्रपती शिवरायांची राजमुद्राचा आधार घेऊन बनवण्यात आले आहे.नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोची येथे छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक नौदलाकडे मराठा सम्राटांनी केलेल्या समृद्ध योगदानाचे प्रतीक होते असे गौरव उद्गार काढले.17व्या शतकात मजबूत नौदल आणि समुद्रावरील वर्चस्वाचे महत्त्व जाणणारा ते पहिले सम्राट होते.आता शिवरायांची स्मृती आता नौदलाच्या झेंडावर आकाशात आणि समुद्रात अभिमानाने फडकेल असेही ते म्हणाले.

स्वतःच्या साम्राज्याला परकीय शक्तींच्या समुद्रावाटे होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून वाचवायला त्यांनी सर्वांत पहिली योजना आखून स्वतःचं नौदल कसं उभारलं होते, हे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.त्यामुळे शिवाजी महाराजांनासुद्धा या कार्यक्रमात मानवंदना अर्पण करत,भारतीय नौदलाने त्यांच्या नवीन चिन्हाचे अनावरण केलं.

Chhatrapati Shivaji’s seal on Indian Navy’s new flag

आजपर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजांवर गुलामगिरीचे चिन्ह होते,ज्याची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नवीन ध्वजाने घेतली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS विक्रांत सुरू करण्यापूर्वी सांगितले.जुन्या चिन्हावर लाल सेंट जॉर्ज क्रॉस होता,जो भारताच्या औपनिवेशिक भूतकाळाशी जोडलेला होता.

भारतीय नौदलाने आज देशाच्या पहिल्या घरगुती विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतच्या उद्घाटनाच्यावेळी नवीन चिन्हाचे अनावरण केले.झेड्यावरील राजमुद्रा हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji’s seal on Indian Navy’s new flag ) यांचा सन्मान करते,ज्यांच्याकडे 17 व्या शतकात नौदलाचा सुसज्ज ताफा होता.

Shivaji Maharaj father of Indian modern Navy

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यात “60 लढाऊ जहाजे आणि अंदाजे 5,000 सैनिकांचा समावेश होता.शिवाजी महाराजांच्या काळात वाढणारी मराठा नौदल शक्ती बाह्य आक्रमणापासून किनारपट्टी सुरक्षित करणारी पहिली होती,असे नौदलाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment