Close Visit Mhshetkari

Independence Day Speech : 15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांसाठी भाषण

Independence Day Speech : सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या. सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

Independence day sheech
Independence day sheech

15 August information Marathi

आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांती देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले.त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार,  गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.

15 ऑगस्ट मराठी भाषण

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे. केंद्र सरकारने पण यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तयार सुरू आहे. भारतात घरोघरी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ हा कार्यक्रम सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. या कार्यक्रमामुळे कोट्यवधी घरांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट या काळात तिरंगा फडकताना दिसत आहे.
स्वतंत्र मिळविण्यासाठी आपल्या देशातील अनेक महान लोकांनी बलिदान दिले होते.अनेक जणांनी या भारत देशाला  गरज मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली होती. विर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी स्वताच्या प्राणाची आहुती दिली.

15 August Marathi Mahiti

म.गांधींजी सारख्या महान लोकांनी सत्याग्रह तसेच अनेक चळवळी करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे. या दिवशी सर्वजण ध्वजारोहण करतात.भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जातात आणि तिथून तिरंगा झेंडा  रोवून हा दिवस साजरा करतात.
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करतात.यादरम्यान ते देशाच्या नवीन उपलब्धी आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती देतात.तसेच अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळा आणि सरकारी कार्यालयांसह ठिकठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात.

Independence Day Speech

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली असून या काळात प्रत्येक आघाडीवर देशाने जगभर आपला ठसा उमटवला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, कृषी, शिक्षण, साहित्य, क्रीडा अशा सर्वच आघाड्यांवर भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. अणु-सक्षम देश असलेल्या आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रातही मोठे यश संपादन केले आहे. भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. जगाचे लक्ष भारताकडे आहे.भारत केवळ क्रिकेटमध्येच नाही तर ऑलिम्पिकमध्येही चांगली कामगिरी करत आहे.

नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 61 पदके जिंकली त्यापैकी 22 सुवर्ण पदके होती.चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया.शेवटी म्हणावेसे वाटते की,

 

तिरंगा आमुचा ध्वज, 
उंच उंच फडकवू .. 
प्राणपणाने लढून आम्ही
 
        शान याची वाढवू ..         
 
धन्यवाद !

   भारत माता की जय ! वंदे मातरम् !!

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment