Income taxIncome Tax New Slab : मोदी सरकार 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असूनही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प 2023 मध्ये करदात्यांना खुशखबर देऊ शकतात.यामध्ये 2023 च्या अर्थसंकल्पात सरकार आयकर सूट मर्यादेत वाढ करू शकते.पाहूया सविस्तर माहिती
Income Tax Slab Change
सध्या देशात 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही,मात्र येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत.मार्च 2022 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की,2020-21 या वर्षात म्हणजेच 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण आठ कोटी तेरा लाख लोकांनी आयकर भरला आहे.9 वर्षात आयकर सवलतीची व्याप्ती वाढवण्यात आलेली नाही.
अर्थमंत्री सीतारामन यांनी मागविल्या सूचना
आयएएनएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणाली (Income Tax) मध्ये सुधारणांना किती वाव आहे या संबंधित सूचना मागवल्या होत्या याबाब चर्चाही सुरू आहे.त्यामुळे सरकार नव्या आणि जुन्या दोन्ही करप्रणालीत बदल करू शकते,असे मानले जाते आहे.
13 महिन्यांनंतर निवडणुका होणार आहेत
मोदी सरकार 2023 मध्ये दुसऱ्या टर्मचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या सुमारे 13 महिन्यांनंतर सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने यावेळी सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.