Close Visit Mhshetkari

Income Tax : या तीन पद्धतीने पर्सनल लोनवरही घेऊ शकता आयकर सवलतीचा लाभ

Income Tax : कर्मचारी वर्ग आयकर वाचवण्यासाठी नवनवीन पर्याय शोधत असतो.त्यासाठी   विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात.सर्वांना गृहकर्जावरील  कर सवलतीची  माहिती असते पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही वैयक्तिक कर्जावरही  आयकर सूट मिळवू शकता?

How to save Income tax

आयकर कायद्यात वैयक्तिक कर्जाच्या सवलतीची प्रत्यक्ष तरतूद नाही.पण वैयक्तिक कर्जाची गणना आपल्या लायबलिटीच्या श्रेणीत केली जाते,उत्पन्नात नाही.अशा वेळी जर तुम्ही वैयक्तिक कर्जाचा वापर असेट क्रिएशन म्हणून केला तर तुम्ही  वरील  सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता.

घर खरेदी किंवा दुरुस्ती 

तुम्ही वैयक्तिक कर्ज  घेतलेले पैसे घराच्या दुरुस्तीसाठी किंवा घर खरेदीसाठी वापरल्यास तुम्ही आयकर सवलतीचा फायदा घेऊ शकता.आयकर कायदा,1961 च्या कलम 24 नुसार,निवासी घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट मिळू शकते.कलम 80C अंतर्गत,जेथे गृहकर्जावरील मूळ रकमेच्या देयकावर दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट घेतली जाऊ शकते तर कलम 24 नुसार, घर बांधण्यासाठी/खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची तरतूद आयकर कायद्यात आहे.

हे पण पहा --  Income tax on NPS : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत NPS व PF धारकांना दिलासा! मिळणार असा सवलत

व्यवसायात गुंतवणूक (Business Investment) 

जर वैयक्तिक कर्जाचा  वापर व्यवसायात गुंतवणूक म्हणून केला तर तुम्हाला करात सूट मिळू शकते.या प्रकरणात,तुम्ही खर्च म्हणून दाखवून व्याजाचा दावा करू शकता आणि आयकर कमी करू शकता.

असेट्समध्ये गुंतवणूक (Asset creation)

तुम्ही घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा वापर स्टॉक्स,दागिने,नॉन रेसिडेंन्शिअल प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी,असेट्समध्ये गुंतवणूक  केले तर तुम्हाला याचा फायदा घेता येऊ शकतो पण ज्या वर्षी व्याज फेडले त्या वर्षी सवलत घेता येत नाही.पण जेव्हा तुम्ही आपली संपत्ती विकता, त्यावर्षी तुम्हाला ते क्लेम करता येतो.

IRT Filling rules

वरील  प्रकरणांमध्ये,एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आयकर सवलतीचा लाभ मूळ रकमेवर मिळत नाही तर पर्सनल लोन घेतलेल्या व्याजाच्या रकमेवरच मिळतो.जर आपण वैयक्तिक कर्जाची रक्कम इतरत्र गुंतवल्यास तुम्हाला कर सवलत मिळणार नाही.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment