Close Visit Mhshetkari

HDFC Scholarship : एचडीएफसी बँकेमार्फत १ ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

HDFC Scholarship : एचडीएफसी बँकेकडून इयत्ता पहली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे.विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे.

HDFC Bank Parivartan’s ECSS Programme

एचडीएफसी बँकेतर्फे २०२३-२४ मधील इयत्ता पहिली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. 

सदरील शिष्यवृत्तीसाठी अर्ज विहित तारखेमध्ये उमेदवारांनी हे अर्ज जमा करण्याचे आवाहन एचडीएफसी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

एचडीएफसी बॅंक परिवर्तन स्कॉलरशिप पात्रता

  • विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे अत्यावश्यक आहे
  • विद्यार्थी हा इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी
  • अभ्यासक्रमामध्ये शिकत असले पाहिजेत.
  • विद्यार्थी हा शासकिय,खाजगी,सरकारी अनुदानित शाळेत शिक्षण घेत असला पाहीजे
  • विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी किंवा समान
  • विद्यार्थ्यांना मागील इयत्तेमध्ये / दहावी / बारावी /पदवी अभ्यासक्रमांमध्ये 55% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक
हे पण पहा --  Pre-Matric Scholarship :  विद्यार्थांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया सुरू; ३० हजार रुपये मिळणार

शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्रे

  1. सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने पासपोर्ट साईट फोटो
  2. मागील वर्षाचे गुणपत्रक
  3. आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती
  4. पालकांचा उत्पनाचा दाखला ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
How to Apply HDFC ecs scolership

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecs-scholarship या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती भरुन अर्ज सादर करु शकता.

एचडीएफसी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज येथे करा

HDFC scholarship

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment