Hartalika Tritiya : भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केली जाते. त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिका तृतीया असते. यादिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत करतात. देशातील अनेक राज्यांत हरितालिका व्रत विविध पद्धतीने साजरे केले जाते.यावर्षी हरतालिका तृतीया पुजा साजरी केली जाते आहे.
Hartalika Trutiya Puja kahani in Marathi
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे.
ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली.इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे.
हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली.
जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही ! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.
हरितालिका तृतीया व्रत नियम
2) हरतालिका तृतीया उपवास करताना याला सोडण्याची पद्धत नसते.दरवर्षी हे व्रत कैवल्य विधी-विधानाने केले पाहिजे.
3) हरतालिका तृतीयेच्या उपवासाच्या दिवशी रात्री जागरण केले जाते. रात्री भजन कीर्तन करावे
4) हरतालिका तृतीयेचा उपवास कुमारिका, सवाष्ण बायका करतात तसेच शास्त्रात किंवा आपल्या धर्मग्रंथात विधवा बायकांना देखील हा व्रत करण्याची परवानगी आहे.
5) हरतालिका तृतीयेला देवी पार्वती आणि महादेवाची विधानाने पूजा केली जाते.
6) हरतालिका तृतीया व्रत मुहूर्त बघून किंवा प्रदोषकाळात केले जाते. सूर्यास्तानंतरचे तीन मुहूर्ताला प्रदोषकाळ म्हटले जाते.हे दिवस आणि रात्र यांचा भेटण्याचा काळ असतो.
7) हरतालिका पूजेसाठी महादेव, देवी पार्वती आणि भगवान गणेशाची वाळूमातीच गणमातीच्या मूर्ती हाताने बनवावी.
8) पूजेच्या ठिकाणी फुलांनी सजवून एक चौरंग ठेवा आणि त्या चौरंगावर केळ्याची पाने ठेवून मूर्ती स्थापित करावी.
9) या नंतर देवांचे आव्हान करून महादेव, देवी पार्वती आणि भगवान श्रीगणेशाची षोडशोपचार पूजा करावी.
11) या मध्ये महादेवाला धोतर आणि पंचा अर्पण करतात.यामधील सर्व सौभाग्याचं लेणं सासू किंवा सवाष्ण बाईच्या पायापडून ब्राह्मणाला दान म्हणून द्यावी.
12) अश्या प्रकारे पूजा केल्यानंतर कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावं. आरती केल्यावर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही-भात कानवाल्याचा नैवेद्य दाखवावा.(हरितालिका तृतीया 2022 व्रत नियम)
हरतालिका पुजेचा विधी
हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या दिघार्युष्यासाठी करतात आणि या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती आणि कहाणी करतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात. घरात जागेवर चौरंग ठेवावे व चौरंगावर स्वछ कापड ठेवून त्यावर एका प्लेटमध्ये मूर्ती स्थापित करून पूजेची तयारी करावी.
चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढू शकतो.त्यांनतर चौरंगावर तांदळापासून एक अष्टकमल तयार करावे व त्यावर कळस ठेवावा.तो कलश पाण्याने भरून घ्या व त्यामध्ये सुपारी, नाणे व हळद घाला. हे सर्व केल्यानंतर कलशवर वर स्वस्तिक बनवा.समोर सुपारी, खारीक, फळे ठेवावीत. पाच सुपारीच्या पानांवर तांदूळ घाला आणि त्यावर गौरी आणि गणेश मूर्ती स्थापित करा.देवासमोर दिवा लावावा. त्यांनतर देवाला अक्षता, हळद कुंकू, फुले वाहून पूजा सुरू करावी.घरातील वडीलधारऱ्यांचा आशिर्वाद घ्यावा व पूजेला सुरवात करावी.सर्वांसाठी निरोगी आरोग्यासाठी व समृद्धीसाठी प्रार्थना करावी वस्तूंची यादी खाली दिलेली आहे. हरतालिका व्रताच्या एक दिवस आधीच पूजेची ही सर्व सामग्री गोळा करावी जी खाली आम्ही देत आहे.
Hartalika puja samagri in marathi
हरतालिका व्रताच्या एक दिवस आधीच पूजेची ही सर्व सामग्री गोळा करावी जी खाली आम्ही देत आहे.
>> भोलानाथ शंकर व देवी पार्वतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी वाळू व मूर्ती ठेवण्यासाठी एक प्लेट.
>> देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग
>> चौरंग झाकण्यासाठी एक स्वछ वस्त्र.
>> एक कलश,ताम्हण
>> रांगोळी
>> समई, आरतीसाठी घंटी
>> हळदकुंकू, अष्टगंध, कापूर
>> खडीसाखर, गुळखोबरे, पंचामृत
>> गुलाल, बुक्का, सुपारी,
>> विड्याची पाने, बदाम, खारका, गुलाल
>> दूध, मध, दही
>> श्रीफळ,पूजेसाठी फळे-फुले, दुर्वा,तुळशीपत्रे बेलपत्र,आंब्याची पाने
>> अगरबत्ती आणि धूप, दिवा लावण्यासाठी वाती इत्यादी.
टिप :- वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.