Harbhara variety : राज्यात दरवर्षी अंदाजे 18 लाख हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड केली जाते.हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 14 % उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते.हरभरा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी योग्य वाणाची निवड करणे गरजेचे असते.तर आज आपण पाहूया महाराष्ट्रातील दर्जेदार हरभरा वाणांची सविस्तर माहिती.
हरभरा देशी सुधारित वाण
हरभरा हे रब्बी हंगामातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे.अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे.राज्यात दरवर्षी अंदाजे 18 लाख हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड केली जाते.हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 14 % उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते.
विशाल
- प्रसारित वर्ष : 1995
- संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहूरी
- परिपक्व कालावधी : 110-115 दिवस
- एकरी बियाणे : 28 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : दाणे टपोरे,बागायती व कोरडवाहूसाठी योग्य.दाणे आकर्षक,पिवळे टपोरे दाने असल्याने अधिक उत्पादन क्षमता आहे.याचे 100 दाण्याचे वजन 27 ते 28 ग्रॅम इतके असते.ही जात मर रोग प्रतिकारक असून अधिक बाजारभाव विशाल ही जात महाराष्ट्राकरिता प्रसारित व बागायतीसाठी योग्य वाण आहे.
- उत्पादन : 14 ते 15 (जिरायती) तर 30 ते 35 (बागायती) क्विंटल प्रति हेक्टरी.
दिग्वीजय
- प्रसारित वर्ष : 2006
- संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
- परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
- एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : दाणे मध्यम आकाराचे बागायती व कोरडवाहूसाठी योग्य.या वाणांचा रंग पिवळसर तांबूस,टपोरे दाणे असून,हा वाण मर रोग प्रतिकारक आहे. याचे 100 दाण्याचे वजन 23 ते 25 ग्रॅम इतके असते. ही जात जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आणि महाराष्ट्राकरिता प्रसारित केला आहे.
- उत्पादन : 14-15 (जिरायती) व 30-35 (बागायती)क्विंटल प्रति हेक्टरी.
जाकी – 9218
- प्रसारित वर्ष : 2005
- संशोधन संस्था : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि
- विद्यापीठ, अकोला
- परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
- एकरी बियाणे : 25 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक.
- उत्पादन : 18-20 क्विंटल प्रति हेक्टरी.
बी. डी. एन.- 93
- संशोधन संस्था : कडधान्य संशोधन
- केंद्र,बदनापूर,जालना (वनामकृवि,परभणी)
- परिपक्व कालावधी : 100-105 दिवस
- एकरी बियाणे : 22 ते 25 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : लवकर तयार होणारा,पाण्याचा ताण सहन करणारा,मर रोग प्रतिकारक,दाणा लहान.
- उत्पादन : 10-11 (जिरायती) क्विंटल प्रति हेक्टरी.
बी.डी.एन. – 797 (आकाश)
- प्रसारित वर्ष : 2006
- संशोधन संस्था : कडधान्य संशोधन केंद्र, बदनापूर, जालना (वनामकृवि, परभणी)
- परिपक्व कालावधी : 105 ते 110 दिवस
- एकरी बियाणे : 25 ते 28 प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : मराठवाडा विभागासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांचे दाणे मध्यम आकाराचे असून या जातीचे दाणे मध्यम आकाराचे असून याचे 100 ग्रॅम दाण्याचे वजन 15 ते 18 ग्रॅम इतके आहे.
- उत्पादन : जिरायती 14 ते 15 क्विंटल/हेक्टर तर,
- बागायत 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टरी.
फुले जी -12
- प्रसारित वर्ष : 1989
- संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
- परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
- एकरी बियाणे : 25 ते 28 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : या वाणाचा रंग आकर्षक, पिवळसर
- तांबूस आहे.100 दाण्याचे वजन 15 ते 16 ग्रॅम पर्यंत आहे.
- उत्पादन : 10-12 (जिरायती ) 28-30, (बागयती) क्विंटल प्रति हेक्टरी.
फुले जी -5 (विश्वास)
- प्रसारित वर्ष : 1989
- संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
- परिपक्व कालावधी : 110 ते 120 दिवस
- एकरी बियाणे : 22 ते 24 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : घाटे लांब मोठे, हिरवा हरभरा म्हणून चांगला.या वाणाचे दाणे टपोरे असून गोलसर आकाराचे आहे.या वाणाच्या 100 दाण्याचे वजन 26 ते 28 ग्रॅम असते.पाणी व खते यांना चांगला प्रतिसाद देणारा वाण आहे.या जातीला राष्ट्रीय वाण म्हणून प्रसिद्ध आहे.
- उत्पादन : जिरायती उत्पादन 10-12 क्विंटल/हेक्टर व बागायती उत्पादन 28-30 क्विंटल/हेक्टरी
विजय
- प्रसारित वर्ष : 1993
- संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
- परिपक्व कालावधी : जिरायत 85 ते 90 दिवस, तर बागायत 105 ते 110 दिवस
- बियाणे : 25 ते 28 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : पाण्याचा ताण सहन करणारा,मर रोग प्रतिकारक जिरायती व बागायतीसाठी योग्य, उशिरा पेरणीसाठी शिफारस. हा वाण मर रोग प्रतिकारक असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य असून हा अवर्षणग्रस्त प्रतिकारक्षम व तग धरून राहणारा आहे.याचे 100 दाण्याचे वजन 18 ते 20 ग्रॅम इतके असते. हा वाण आकर्षक पिवळे व टपोरे दाणे,अधिक उत्पापदन क्षमता असणारा आहे.
- उत्पादन : जिरायत प्रायोगिक उत्पादन 14 ते 15 क्विंटल/हेक्टर,बागायत प्रायोगिक उत्पादन 35 ते 40 क्विंटल/हेक्टर,
kabuli harbhara van
श्वेता ( ICCV-2)
- प्रसारित वर्ष : 1992
- परिपक्व कालावधी : 100-105 दिवस
- एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : या वाणाच्या फुलांचा रंग पांढरा असून वाढ पसरट होते. या वाणास सुरुवातीला फुले लागण्यासाठी 38-48 दिवस लागतात.या वाणाच्यास दाण्याला पांढरा रंग प्राप्त झालेला आहे. दाणे टपोरे जड असून 100 दाण्याचे वजन 24-28 ग्रॅम एवढे भरते. हा वाण मररोगास प्रतिबंधक आहे.तसेच ओलिताखाली लागवडीस अत्यंत उपयुक्त आहे.
- उत्पादन : बागायती सरासरी उत्पादन 25 -30 क्विंटल प्रति हेक्टरी.
PVK (काबुली-2)
- प्रसारित वर्ष : 2000
- संशोधन संस्था : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला
- परिपक्व कालावधी : 100 ते 105 दिवस
- एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी.
- वैशिष्ट्ये : काबुली वाण,अतिशय टपोरे दाणे
- उत्पादन : 12 ते 15 क्विंटल प्रती हेक्टरी.
सर्वोत्तम हरभरा वाण महाराष्ट्र
लहान आकारमानाच्या वाणाकरिता उदा.पीडीकेव्ही कांचण, विजय,विकास 50 ते 69 किलो बियाणे लागते.मध्यम आकाराच्या वाणाचे पीडीकेव्ही कनक,जाकी 9218 दिग्विजय,आकाश या जातींचे 75 ते 85 किलो बियाणे लागते.
मोठ्या वाणाचे म्हणजेच काबुली वाणाचे 100 ते 110 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते.
हरभरा लागवड | Harbhara lagwad
कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.ओलीताखालील हरभऱ्याची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत आटोपावी.त्यानंतर 30 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करायची असल्यास पेरणी करिता राज,विजय 202 या वाणाची निवड करावी. विजय,विशाल,दिग्विजय,फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे वाढ मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहे.
काबुली हरभऱ्यामध्ये विराट,पिकेव्ही -2,पिकेव्ही – 4 आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत.यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत.
फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्याचा वाण आहे.विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे.फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता प्रसारित केला आहे.