Close Visit Mhshetkari

Guru Purnima कधी साजरी होणार यंदाची गुरु पौर्णिमा?; मुहूर्त,महत्त्व आणि इतिहास

Guru Purnima :  ही आषाढ महिन्यातील (muhurat) पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास (Maharshi Vyas) यांचा जन्म याच दिवशी झाला.ते तपश्चर्यामुळे सावळे रंगाचे होऊन गेले होते म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हटले जाऊ लागले. असे म्हणतात की त्यांचा जन्म यमुना नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर झाला होता आणि सावळ्या रंगाचे असल्यामुळे .

Guru purnima
Guru purnima

गुरुपौर्णिमा Guru Purnima

आपल्या भारत भुमीत गुरू शिष्य परंपरा फार प्राचीन काळापासुन चालत आलेली आहे. शिष्य अध्ययनाकरीता गुरूजवळ येतो आणि गरू हातचे न राखता शिष्याला अध्ययना सोबतच जिवनाच्या वाटचालीतले दर्शन घडवुन शिष्याला घडवतो.

एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रितीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरू चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवुन अत्यंत परिश्रमाने शिष्याला घडवतो. या गुरूला काही अंशी उतराई होण्याची संधी शिष्याला मिळावी त्याकरीता गुरूपौर्णिमा हा दिवस निर्मीलेला आहे.

गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास (Maharshi Vyas) यांचा जन्म याच दिवशी झाला.गुरूपौर्णिमेला व्यासपुजा करण्याची पध्दत आहे. महर्षी व्यासांनी महाभारतासारखा अलौकिक आणि सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ लिहीला.

महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र, नितीशास्त्र, व्यवहारशास्त्र, आणि मानसशास्त्राची देखील ओळख करून देतो. अश्या महान आणि श्रेष्ठ ग्रंथाची निर्मीती करणारे महर्षी व्यास. त्यांच्या ऐवढा महान गुरू अद्याप झाला नाही, त्यांच्या श्रेष्ठत्वाची पुजा करण्याचा हा गुरूपौर्णिमेचा दिवस व्यासपौर्णिमा म्हणुन देखील ओळखला जातो. ते तपश्चर्यामुळे सावळे रंगाचे होऊन गेले होते म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हटले जाऊ लागले.

असे म्हणतात की त्यांचा जन्म यमुना नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर झाला होता आणि सावळ्या रंगाचे असल्यामुळे त्यांना कृष्णा द्वैपायन असे नाव देण्यात आले.वेद व्यासांच्या जन्मामुळे  हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याशिवाय व्यास जयंतीही (Vyas Jayanti) या दिवशी साजरी केली जाते. तसेच त्यांची पूजा केली जाते.

महर्षी वेद व्यास यांना पहिले गुरु मानले जाते. ते संस्कृतचे अद्वितीय जाणकार होते. त्यांनी श्लोकांची रचना केली आहे. वेदांना वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागण्याचे श्रेयही महर्षी वेद व्यासांनाच जाते. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेबद्दल अधिक माहिती.

Guru Purnima in Marathi

गुरुपौर्णिमा मुहूर्त –

गुरुपौर्णिमा बुधवार, 13 जुलै रोजी येणार आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होत आहे. त्याच वेळी, पौर्णिमा तिथी 13 जुलै रोजी दुपारी 12:06 वाजता समाप्त होईल.

गुरु पौर्णिमेला तयार होत आहेत चार राजयोग –

ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गुरुपौर्णिमेला चार राजयोग तयार होत आहेत. या दिवशी गुरु, मंगळ, बुध आणि शनि शुभ स्थितीत असणार आहेत. या चार ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे शशा, रुचक, भंग आणि हंस असे चार राजयोग तयार होत आहेत. याशिवाय बुधादित्य योगही या दिवशी तयार होत आहे. तसेच शुक्र देखील अनुकूल ग्रहांसह बसला आहे. त्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमा विशेष मानली जात आहे.

काय करावे गुरुपौर्णिमेला

धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा फार फलदायी असते, असे मानले जाते. याशिवाय या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही खूप फलदायी असते.

या दिवशी भगवान विष्णूला पंचामृत अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यासोबतच त्यांच्या भोगात तुळशीची डाळ वापरणे देखील शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण केल्याने तिची विशेष कृपा प्राप्त होते. एवढेच नाही तर या दिवशी गायीला चारा दिल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात.

आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. हाच दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. कारण याच दिवशी व्यास ऋषींनी महाभारताचे लेखन केले होते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश.

गुरु ज्ञान देतात ते ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात म्हणून गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मनुष्य हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो कारण माणसाजवळ विद्या आहे. ही विद्या देण्याचे काम गुरुच करतात. आपला पहिला गुरु म्हणजे आई आणि दुसरा गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक.

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन आणि गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सोबतच हा दिवसही शिक्षकवर्गासाठी फार महत्त्वाचा असतो.

भारतीय संस्कृतीतील गुरू परंपरा आजही पाहायला मिळते. गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श, अमर्याद ज्ञान. हेच ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच गुरु ऋण फेडण्याचा मार्ग आहे. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment