Government employees : महाराष्ट्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आज आणखी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत एक आनंदाची महत्त्वाची बातमी आणि शासन निर्णय आज समोर आला असून यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि महागाई भत्त्यामध्ये दीडपट वाट होणार आहे तर बघूया सविस्तर माहिती
7th pay commission news
सा.प्र.वि.शासन निर्णय दिनांक ०६.०८.२००२ अन्वये आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी 7th pay commission news अंतर्गत प्रोत्साहन म्हणून देण्यात येत असलेला एकस्तर पदोन्नती योजनेचा लाभ अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना (भा.प्र.से./ भा.पो.से / भा.व.से.) ७ व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेमध्ये दि. ०१.०१.२०१६ पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे.
Government employees salary
तसेच या यापुढील वेतन आयोगानुसार / वेतन निश्चितीबाबतच्या सुधारित वेतन नियमानुसार वित्त विभागाकडून राज्य शासकीय अधिकारी / कर्मचा-यांना
एकस्तर पदोन्नती योजनेंतर्गत लाभ मिळण्यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचना / स्पष्टीकरणानुसार संबंधित अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांनाही हे लाभ देय राहतील.
सदर लाभ संबंधित अधिकारी आदिवासी/ नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच अनुज्ञेय राहील. संबंधित अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्याच्या मूळ संवर्गातील वेतनश्रेणीत पूर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन घेईल.
वेतन व महागाई भत्ता दरवाढ
गडचिरोली व गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत भारतीय प्रशासन सेवा/ भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना शासन निर्णय क्र. १०१६/प्र.क्र.१४०/२०१६/ दहा, दिनांक १२.०५.२०१६ अन्वये अनुज्ञेय करण्यात आलेले दीडपट दराने वेतन व महागाई भत्त्याचे लाभ यापुढेही यासंदर्भात गृह विभागाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुज्ञेय राहतील.
DA hike news
गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागातील नियुक्तीमुळे दीडपट वेतन व महागाई भत्ता मिळत असलेल्या कालावधीत संबंधित भारतीय प्रशासन सेवा / भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना आदिवासी/ नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अधिकान्याकरिता लागू करण्यात आलेल्या एकस्तर पदोन्नती योजनेचा व अन्य आर्थिक सवलतींचा लाभ अनुज्ञेय असणार नाही.एकस्तर पदोन्नती व दीडपट दराने वेतन अनुज्ञेय करताना त्यावरील महागाई भत्यासह इतर अनुषंगिक भत्ते हे मूळ वेतनावर अनुज्ञेय राहतील, वाढीव वेतनावर नाही.