Close Visit Mhshetkari

Goat farming शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत मिळणार गाय,म्हैस,शेळी कुक्कुटपालन साठी 1 लाख रुपये

Goat Farming : महाराष्ट्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नावाने “शरद पवार ग्रामसमृद्धी” योजना आणली आहे.या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय-म्हैस पालनासाठी, शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे.

3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात Goat Farming, Poultry Farming योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना नेमकी काय आहे ? अर्ज कसा करायचा,याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

शरद पवार ग्राम समृद्धी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने “शरद पवार ग्राम समृद्धी” योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 रोजी सुरू महाराष्ट्र सरकार ने सुरू केली.या योजनेचे नाव शरद पवारांनी त्यांच्या जन्मतारखेचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे.Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2022 च्या माध्यमातून खेड्यांचा आणि शेतकर्‍यांचा विकास होईल आणि त्यांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेचे नाव श्री शरद पवार साहेब यांच्या नावावर ठेवण्यासाठी महा विकास आघाडीने सुचविले होते.मंत्रालयाने या योजनेस मान्यता दिली आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी वैयक्तिक लाभाच्या चार योजना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी‘ योजनेंतर्गत राबविण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिले जाते आहे.

हे पण पहा --  Poultry farm : शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू,असा करा अर्ज

1) गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे
स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल. दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा व त्यानंतर अधिक गुरासाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान देय राहील.

2) शेळीपालन शेड बांधणे
किमान दोन शेळ्या असलेल्या भूमीहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता येऊ शकेल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यासाठी तिप्पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

3) कुक्कुटपालन शेड बांधणे
100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थीना पक्ष्याची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. यासाठी प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे.Poultry Farming

4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग
शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठीची ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रीय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात.

आवश्यक पात्रता –

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • लाभार्थी कोणत्याही संघटनेचा भाग असू नये कारण हि योजना राज्यातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी आहे.
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आवश्यक आहे.

Leave a Comment