Close Visit Mhshetkari

Goat farming yojana : शेळी / मेंढी पालन योजना 1 लाख 3 हजार रुपये अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरू! पहा व लगेच करा अर्ज

Goat-farmingGoat Farming : शेतकरी मित्रांनो पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र शासन तर्फे अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी  अनुदान मिळणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

Goat farming loan

शेळी /पालन पालन करणे साठी आता  एक लाख तीन हजार रुपये अनुदान मिळणार असून “शेळी पालन योजना” अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र,खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

Goat farming योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही.सदरील  साठी ऑनलाईन फाॅर्म भरण्याची अंतिम तारीख  11.1.2023 आहे.

शेळी पालन योजना कागदपत्रे

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) 8 अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

हे पण पहा --  land records फक्त 100 च्या स्टॅम्प पेपरवर करा वडीलोपार्जीत शेत जमीन

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

शेळी पालन योजना लाभार्थी पाहण्यासाठी क्लिक करा

शेळी पालन योजना अनुदान

अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप(शेळी पालन योजना अनुदान करण्यासाठी खालील प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

1) शेळ्या खरेदी

  • ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )८०,०००/- (१० शेळ्या )
  • ६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
    ६०,०००/- (१० शेळ्या )

2 ) बोकड खरेदी

  • १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )
    १०,०००/- (१ बोकड )
  • ८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
    ८,०००/- (१ बोकड )

3) शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )

  • १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
    रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
  • रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )

4 ) शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य ,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित

Leave a Comment