Close Visit Mhshetkari

शेतकऱ्यांनो सावधान ! पिका बरोबरच माणसावर देखील होतेय घोणस अळीचा प्रादुर्भाव Ghonas worms

Ghonas worms : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेली अतिविषारी घाेणस अळी रविवारी सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकरी मावा, हुमणी आणि गोगलगाय अशा अळी व किडींच्या संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अतिविषारी अळीच्या प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहिले.घोणस अळीचा (Ghonas ali ) परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना आपल्याला दिसत आहे.

ghonas worms
ghonas worms

Ghonas Ali marathi mahiti

दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहेत. या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारची कीड पडत आहे. काही दिवसांपूर्वी घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव समाेर आला हाेता. ही अळी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते. तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवरदेखील होत आहे.काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याला घोणस अळीने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते.

घोणस अळी  ही खुप धोकादायक असून.बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात 3 व खेडे पाडे 4 व नगर मध्ये 6 पेशंट सापडले होते.ही घोणस अळी चावत नसली तरी त्यापासून माणसांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. राज्यभरात चर्चेत असलेल्या या अळीची आजवर सांगली जिल्ह्यात नाेंद नव्हती.अतिविषारी घाेणस अळी रविवारी सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.रविवारी घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोणस अळी संपर्कात आल्यावर होणारे परिणाम

“घोणस अळी संपर्कात आल्यावर होणारे परिणाम”खालील प्रमाणे आहेत

>> शरीरा वर चढते ज्या भागावार असते त्या भागावर आग होते.

>> खुप मोठ्या प्रमाणात उलटी होते.

>> शरीर वर काटे आल्या सारखे होते.

>> एक दोन तासात पक्षघात सारखे अर्धे शरीर काम करत नाही.

घोणस अळीचा प्रादुर्भाव हा ऊस,गवत,आंबा अशा विविध पिकांवर होताना दिसत आहे. या किड येत आणि निघून जाते. या अळीच्या शरीरावर केस असतात. या केसामधून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते. ते विषारी असते. अशा प्रकराच्या बऱ्याच अळ्या असतात. पण काही अळ्या या विषारी रसायन बाहेर सोडत असतात. त्यामुळे जर आपण अशा अळीला स्पर्श केला किंवा त्या अळीच्या संपर्कात आपली त्वचा आली तर काही मिनीटातच त्या भागाची आग होते.

जवजवळ दोन ते तीन दिवस याचा प्रभाव जाणवू शकतो. काही व्यक्तींमध्ये या रसायनाला ॲलर्जी गुणधर्म असतात, त्यामुळं अशा लोकांना या अळीचा त्रास होता.त्यामुळे ज्या ठिकाणी अशा अळ्या असतील तिला स्पर्श करु नका.अळीला बाहेर उचलून टाकायचे असेल तर ग्लब्ज वापरा. घोणस अळी कोणत्याही पिकावर मोठ्या प्रमाणात येत नाही.ती येते आणि जाते असेही भामरे म्हणाले आहे

घोणस अळीवर नियंत्रण कसे करावे ?

Ghonas ali गवता वर असल्यास दिसून येत नाही तरी सर्व नागरिकांनी शेतामधी जाताना आपली काळजी घ्यावी व असे काही जाणवल्यास जवळच्या हॉस्पिटल मध्ये जावे.कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ही कोणत्याही पिकावरील कीड नाही तर एक गवतावरील अळी आहे.’अळीवर नियंत्रण कसे करावे ?’

जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर (Cloro Sypher) फवारणी करणे गरजेचे आहे अशी माहिती दिली आहे.परंतु जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही.

मात्र शेतकऱ्यांनी शेतात काम करताना अळीपासून संरक्षण करण्यासाठी स्वतःचे पुर्ण शरीर झाकेल असे कपडे घालने गरजेचे आहे.तसेच ही अळी शरीरावर देखील येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.

Leave a Comment