Gharkul yojana : शिंदे सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.लाभार्थ्यांना शिंदे सरकार घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध कशा पद्धतीने करून देणार आहे या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोतआहोत.
![]() |
Gharkul Yojana |
घरकुल बांधकामासाठी जागा
इंदिरा आवास योजना
इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर घेण्यासाठी जमिनीची उपलब्धता होत नाही,जमीन नसल्याने सरकारी यंत्रणांनाही घरकुल बांधून देणे शक्य होत नाही.त्यामुळे योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना (Gharkul Yojana list) जागा खरेदीसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय या नव्या योजनेंतर्गत वाढीव अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे इंदिरा आवास योजना व राज्य पुरस्कृत अन्य योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
पं.दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना
Gharkul Yojana Maharashtra
इंदिरा आवास योजनेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघरांपैकी ज्यांना स्वत:ची जागा नाही अशा कुटूंबाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील योजनेस केंद्र शासनाने सन २०१०-११ पासून मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत असून त्यामध्ये केंद्र व राज्य हिस्सा ५०:५० % असा आहे. सन २०१३-१४ या वर्षापासून या योजनेतंर्गत घरकुलाच्या जागेसाठी प्रत्येक लाभार्थ्यास जागा खरेदी करण्यासाठी रु.२०,०००/- (केंद्र रू.१०,०००/- व राज्य रू.१०,०००/-) अनुज्ञेय आहे.
लाभार्थ्यास जागा खरेदीसाठी रू.२०,०००/- अथवा प्रत्यक्ष खर्चाची रक्कम यापैकी जी कमी असेल एवढे आर्थिक सहाय्य देण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत राज्यातील ग्रामीण भागातील जागेचे दर विचारात घेता रू.२०,०००/- मध्ये घरकुलासाठी जागा खरेदी करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या नगण्य आहे.
जागे अभावी इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन लाखाच्या वर आहे.त्यामुळे केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेच्या निधीचा राज्य शासनास पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेता येत नाही.
भूमिहीन घरकुल अर्थसहाय्य योजना
केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत रू.१०,०००/- व या योजनेअंतर्गत रु.४०,०००/- असे एकूण रु.५०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
(अ) इंदिरा आवास योजनेअंतर्गत २० चौ.मी. घरकुलाचे बांधकाम करण्याच्या सूचना आहेत. याव्यतिरिक्त शौचालय व घरकुलाच्या सभोतालची जागा गृहीत धरल्यास साधारणपणे ५०० चौ.फूट जागेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे शक्य आहे.त्यानुसार घरकुल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(ब) मोठया ग्रामपंचायती तसेच शहरा शेजारील ग्रामपंचायतीमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता,५०० चौ. फूटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली (G+१) किंवा तीन मजली (G+२) इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी रू.५०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.वरील (अ) व (ब) मध्ये प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी ५०० चौ. फूटापर्यंत असल्यामुळे जागेची किंमत व रू.५०,०००/- यापेक्षा जे कमी असेल तेवढे अर्थसहाय लाभार्थ्यास देण्यात येईल. जागेची किंमत रु. ५०,०००/- पेक्षा जास्त असल्यास व त्यावरील रक्कम लाभार्थी स्वतः देण्यास तयार असल्यास त्यास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
Maharashtra Gharkul Yojana
अशी मिळणार घरकुल बांधकामासाठी जागा