Close Visit Mhshetkari

Ganesh Chaturthi या शुभ मुहूर्तावर करा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या मुहूर्त साहित्य आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi : संपूर्ण देशात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा आणि भक्ती केली जाते तसेच त्यांना विविध प्रकारचे नैव्यद्य अर्पण केले जातात. गणेश चतुर्थीला गणपतींची स्थापना झाल्यानंतर 10 दिवस गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी उत्सव 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे.

Ganesh chaturthi
Ganesh chaturthi

गणेश मूर्ती प्रतिष्ठापना विधी

 गणपतीच्या मू्र्तीची स्थापना करताना सर्वप्रथम चौरंगावर गंगाजल शिंपडा आणि ते शुद्ध करा. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्यावर अक्षता ठेवा. यानंतर श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेवा. आता गणपतीला स्नान घाला आणि गंगाजल शिंपडा. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी स्वरूपात सुपारी ठेवा.गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा. दुर्वा आणि फळं, फूलं अर्पण करा. हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाची आरती करा. त्यानंतर गणेशजींच्या ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा.”गणेश मूर्ती प्रतिष्ठापना विधी

गणपती मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्त 

 कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो  आणि तेव्हापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेशोत्सवाचा हा उत्सव 10 दिवस चालतो. प्रत्येक घरात गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून आणि मूर्तीचे विसर्जन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.  

 या वर्षी “गणपती मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्त” 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.38 चा असून या वेळेत आपणास गणपती बाप्पाची स्थापन करता येईल.

गणपती बसवण्यासाठी लागणारे साहित्य

गणपती बसवण्यासाठी लागणारे साहित्य – गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागतात.

गणपतीच्या मू्र्तीची स्थापना करताना सर्वप्रथम चौरंगावर गंगाजल शिंपडा आणि ते शुद्ध करा. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्यावर अक्षता ठेवा. यानंतर श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेवा. आता गणपतीला स्नान घाला आणि गंगाजल शिंपडा. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी स्वरूपात सुपारी ठेवा. गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा. दुर्वा आणि फळं, फूलं अर्पण करा. हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाची आरती करा. त्यानंतर गणेशजींच्या ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा 

हे पण पहा --  Anant Chaturdashi कधी आहे अनंत चतुर्दशी? जाणून घ्या गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त विधी पुजा महत्त्व

गणेश चतुर्थी पूजा कशी करायची ? 

गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे.त्यानंतर स्नान करावे. सहन करून झाल्यानंतर घरातील मंदिरात किंवा देव घरात दिवा लावायचा आहे. त्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. स्थापना करून झाल्यानंतर गंगाजल ने अभिषेक करावा. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर फुले अर्पण करावीत. सिंदूर लावून ध्यान करावयाचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर श्री गणेशाची आरती करायची आहे.प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे.

देवापुढे देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा. आसनावर बसावे. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.

Ganesh Murti Sthapana Vidhi

 नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता वाहावे. ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात. धूप, अगरबत्ती ओवाळावी.

गणपतीची आरती ( Ganpati Aarti) 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची |

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । 

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।। 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥ 

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय ॥२ ॥  

लंबोदर पीतांबर फणी वरवंदना । 

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना  

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । 

 दर्शनमात्रे मनकामना पुरती !! दर्शन ||३||

टिप :- रील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment