Close Visit Mhshetkari

Free cycle scheme : मुलींसाठी 5 हजार रुपये अनुदानावर सायकल वापट योजना सुरू; लगेच करा अर्ज

Free Cycle scheme : महाराष्ट्र शासनाकडून पंचायत समिती मार्फत विद्यार्थींनींना सायकल वाटप योजना राबविण्यात येते.या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थींनींकडुन  साठी अर्ज मागविण्यात येत आहे.यासाठी अर्ज प्रक्रिया,सायकल वाटप योजना पात्रता, योजनेचे सायकल वाटप योजना स्वरुप याबाबतची संपुर्ण माहीती खालीलप्रमाणे पाहुयात.

Cycle Vatap Yojana Maharashtra

इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना  अंतर्गत सायकल वाटप करण्यात येते.यासाठी सदर शाळा ही मान्यताप्राप्त , अनुदानित,शासकिय असणे आवश्यक आहे.यासाठी सदर विद्यार्थींनी गरजु व गरीब असणे आवश्यक आहे.

सदर विद्यार्थींनीचे घरापासुनचे अंतर 0 ते 5 किलोमिटर तसेच दुसऱ्या टप्यामध्ये 5 कि.मी पेक्षा जास्त अंतर असणाऱ्या विद्यार्थींनींना सायकल वाटप योजना अंतर्गत लाभ देण्यात येते.गरजू मुलींना इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचा शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वतंत्रता राहील.

मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र

‘मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र’ अंतर्गत मिळणारी लाभाची राशी DBT च्या सहाय्याने लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याने मुली सायकल खरेदी करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
सायकल वाटप करताना गांवे / वाड्या / तांडे / पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत जिथे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते नाहीत , वाहतुकीसाठी पुरेशे साधन नाहीत अशा मुलींनी प्राधान्य देण्यात येते.

मोफत सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये

  • मुलींसाठी मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली योजना आहे.
  • गरजू मुलींना इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचा शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वतंत्रता राहील.
  • मुलीच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
Free Cycle scheme Maharashta
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.त्यामुळे मुलींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी DBT च्या सहाय्याने लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment