Employees leave : मुंबई नागरी सेवा नियमांतील विद्यमान तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश, हे विषयवार एकत्रित करून आणि त्यांची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ नुसार शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक एमएससी – १०८१/४/एम्सीएसबार-सेल, दिनांक २३ जुलै १९८१ या अन्वये हे नियम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले असून, दिनांक १५ ऑगस्ट १९८१ पासून ते अंमलात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या इंग्रजी प्रकाशनात ३१ मे १९८५ पर्यंत अरे ज्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यांचा म अंतर्भाव करून हे रजा धोरण अद्यावत करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २७ जून १९८५ या राजपत्रात यासंदर्भात अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी – रजेचा हक्क
रजा म्हणजे कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी होय.
सरकारी कर्मचाऱ्यांना हक्क म्हणून रजा मागता येत नाही.
रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, लोकसेवेच्या निकडीमुळे कोणत्याही प्रकारची रजा नाकारणे किंवा रद्द करू शकतो.
रजा मंजूर करणाऱ्या संबंधित प्राधिकान्यास, शासकीय कर्मचान्याच्या लेखी विनंती खेरीज देय असलेल्या आणि मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येणार नाही.
निरनिराळ्या अर्जदारांना देय असणारी शिल्लक रजा सहजगत्या कोणत्या शासकीय कर्मचाऱ्या रजा देता येईल.
मंजुरीमुळे संवर्गातील कर्मचारी संख्या खूपच कमी होता कामा नये
एखाद्या सेवेतील किंवा विभागातील कर्मचाऱ्याची संख्या कामासाठी आवश्यक असलेल्या किमान संख्येहून कमी होत असेल तर रजा मंजूर करण्यात येऊ नये.
रजेमुळे अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची कर्तव्य सामान्यतः त्याच्या किंवा त्याच ठिकाणी कार्यरत शासकीय कर्मचाऱ्याने पार पाडणे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेचे प्रकार
1) अर्जित रजा
दीर्घ सुट्टी विभागांव्यतिरिक्त अन्य विभागांमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यार्थ व्यतीत केलेल्या कालावधीच्या प्रमाणात अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल.
एकावेळी १२० दिवस एवढीच कमाल अर्जित रजा मंजूर करता येईल.जेव्हा शासकीय कर्मचा-यास देय असलेली अर्जित रजा १८० दिवस एवढी होईल तेव्हा अनुसार अशी रजा अर्जित होणे बंद होईल.
2) अनर्जित रजा
संपूर्ण सेवेच्या कालावधीतील अनर्जित रजा कमाल ३६० दिवसांपर्यंत मर्यादित असावी.त्यापैकी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त ९० दिवस आणि सर्व मिळून जास्तीत जास्त १८० दिवस इतकी रजा असू शकेल.
शासकीय कर्मचाऱ्यांची जेवढी अर्धवेतनी रजा,अर्जित होईल त्या रजेच्या खाती अनर्जित रजा खर्ची टाकण्यात येते.
निवृत्तिपूर्व रजा वगळून इतर बाबतीत कायम सेवेतील शासकीय कर्मचाऱ्याला पुढील शर्तीच्या अधीन राहून अनर्जित रजा मंजूर करता येते.
शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची बाजवी आहे, अशी रजा मंजूर करणाऱ्यांची सक्षम प्राधिकान्याची खात्री पटलेली असावी;
त्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होण्याची शक्यता असेल त्या मर्यादे पर्यंत अनर्जित रजा असावी
3) अर्धवेतनी रजा
शासकीय कर्मचाऱ्याला त्याने या पूर्ण केलेल्या एकूण सेवेच्या प्रत्येकी २० दिवसांची अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असेल. सदरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्रांवर अथवा खाजगी कामासाठी देता येईल .मात्र, कायम सेवेत नसलेला शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कानावर परत येईल.
रजा मंजूर करणान्या प्राधिकान्यास सकारण वाटत नसेल, तर अशा शासकीय कर्मचाऱ्याला अर्धवेतन रजा मंजूर करता येणार नाही परंतु, शासकीय कर्मचारी सेवा करण्यास पूर्णपणे व कायमचा असमर्थ झाला आहे असे वैद्यकीय प्राधिकान्याने घोषित केले असेल तर त्याला अर्धवेतनी रजा मंजूर करता येईल.
निलंबनाचा कालावधी हा ‘निलंबन कालावधी’ म्हणून समजण्यात येतो तेव्हा तो अर्धवेतनी रजेच्या प्रयोजनासाठी सेवेची पूर्ण वर्षे मोजतांना वगळण्यात यावा.
4) परिवर्तित रजा
परिवर्तित रजा म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना त्याला देय असलेल्या अर्धवेतनी रजेच्या निम्मे परिवर्तित रजा पुढील नियमाच्या अधीन राहून, वैद्यकीय प्रमाणपत्रावर मंजूर करता येईल येते.
शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची वाजवी शक्यता आहे, अशी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली पाहिजे.
परिवर्तित रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा अशा रजेच्या दुप्पट दिवस देव अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येतील.
रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकान्याला लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यताप्राप्त पूर्णकालीन किंवा अंशकालीन शिक्षणक्रमासाठी आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्याकरिता देखील सेवेच्या संपूर्ण कालावधीत कमाल ९० दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येईल.
5) असाधारण रजा
असाधारण रजा बिनपगारी रजा असते.सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील परिस्थितीत असाधारणधारण रजा मंजूर करता येईल.
शासकीय कर्मचाऱ्यांने असाधारण रजा मंजूर करण्यात यावी असा लेखी अर्ज केला करावा लागतो.शासकीय कर्मचान्याला पुढील हून अधिक साधारण रजा कोणत्याही एका वेळी मंजूर करण्यात येणार येते.
तीन महिने – शासकीय कर्मचान्यानी तीन वर्षाची संतत सेवा पूर्ण झाली असेल तर नियमानुसार आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अशा रजेसाठी त्याने केलेल्या पाहिजे.तीन महिने असाधारण रजा देय अनुज्ञेय असेल.
रजेवरून हजर होण्याचे नियम
रजेवर असलेल्या शासकीय ककर्मचाऱ्यांना त्याला मंजूर करण्यात आलेल् रजेचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी, रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाने तशी दिल्याखेरीज कामावर परत येता येणार नाही.
निवृत्तिपूर्व रजेवर गेला असेल त्या पदावरची नियुक्ती करणाऱ्या सक्षम प्राधिकान्याची संमती असल्याखेरीज कामावर परत राजू होण्यास प्रतिबंध येईल.
वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करीपर्यंत त्याला कामावर परत येता येणार नाही.
रजेवरून परत येणाऱ्या शासकीयसकीय कर्मचाऱ्यांना तो रजेवर जाण्यापूर्वी त्याने ज पद धारण केले असेल त्या पदावर एक नित्याची बाब म्हणून रुजू होण्यासंबंधी स्पष्ट आदेश नसतील तर अशा पदावर रुजू होण्याचा हक्क असणार नाही.
शासकीय कर्मचारी,रजवरून परत आल्यानंतर रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकऱ्याला अथवा रजा मंजुरीच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्राधिकायाला कामावर परत आल्याचे कळवील व आदेशांची प्रतीक्षा करील.
रजेला सुट्टी जोडणे
कर्मचाऱ्याची रजा ज्या दिवशी सुरू होते त्या दिवसाच्या लगत पूर्वीचा दिवस किंवा रजा दिवस समाप्त होते त्याच्या नंतरचा दिवस सुट्टीचा वा लगतच्या सुट्टीचा एक दिवस असे तेव्हा शासकीय कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवसाअखेर त्याने कामाचे ठिकाण सोडण्याचा व सुटीवरुण येणाऱ्यांना सुट्टीच्या नंतरच्या दिवशी कामाच्या ठिकाणी परत येण्यास परवानगी देता येईल.
रजेच्या अगोदर सुट्टीचा कालावधी जोडलेल्या असतील तर सुटयानंतरच्या दिवशी रजा आणि तदानुषंगिक वेतन व भते यांची पुनर्व्यवस्था अमलात येईल.
रजा कालावधी आणि वेतन
अर्जित रजेवर जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी त्याला मिळालेल्या वेतनाइतके रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.
अर्धवेतनी रजेवर अथवा अर्नार्पित रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास वेतन रकमेच्या निम्मी रक्कम रजा वेतन म्हणून मिळण्याचा हक्क असेल.
परिवर्तित रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नियम अनुसार अनुज्ञेय असलेल्या रकमेइतके रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.
असाधारण रजेवर असलेल्या शासकीय मान्य कोणतेही रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही.