Close Visit Mhshetkari

Education policy : मोठी बातमी.. राज्यातील शाळा संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! आता आपल्या गावातील शाळा…

Education policy : राज्यामध्ये विविध व्यवस्थापनामार्फत साधारणत १ लाख १० हजार शाळा चालविल्या जातात त्यापैकी सुमारे ६५ हजार शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविल्या जातात.

राज्यातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी शासनाने राज्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव, वाडी, वस्ती या ठिकाणीही शाळाची निर्मीती केली आहे.

Cluster school | समुह शाळा

शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकानुसार कमी पटाच्या शाळांमध्ये या सर्व बाबींची अनुपलब्धता असल्याने याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर व विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे.

शाळेची स्वतःच्या गावात असलेली उपलब्धता सोडली तर मूले शैक्षणिक गुणवत्तेपासून वंचित राहिल्याचे दिसते.या सर्व बाबींचा विचार करून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी व पुरेशा शैक्षणिक सुविधा प्रत्येक मुलास मिळाव्यात या उद्देशाने नंदुरबार येथील तोरणमाळ व पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन्ही ठिकाणी समूह शाळांचा उपक्रम राबविण्यात आला होता.

आता राज्यातील इतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील छोटया शाळांचा विशेषतः आदर्श शाळांचा कमी पटाच्या शाळा जोडण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मा.उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत.

हे पण पहा --  New Education policy : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... सरकारने इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय

आता ‘या’ शाळा होणार एकत्र

समूह शाळा निर्माण करण्यामागे विद्यार्थांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात व त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे.पानशेत जिल्हा पुणे यांचा समूह शाळेबाबत प्रस्ताव सोबत उदाहरणादाखल उपलब्ध करून दिला आहे.

सदर प्रस्तावाचे अवलोकन करून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्हयातील कमी पटाच्या राम शाळांचा विचार करून त्यापैकी शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

समुह शाळा शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा

Cluster School

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment