Close Visit Mhshetkari

Education calendar : महाराष्ट्र शैक्षणिक दिनदर्शिका 2023 प्रकाशित; येथे करा PDF डाऊनलोड

Education calendar : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाने 2023 मध्ये केल्या जाणाऱ्या शैक्षणिक कामकाजा संदर्भात व शालेय शिक्षण विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व योजनांची माहिती देणारी दिशादर्शिका म्हणजेच दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.

शैक्षणिक दिनदर्शिका 2023

शिक्षण आयुक्तालयापासून शिक्षणाधिकाऱ्यापर्यंतच्या सर्व कार्यालयांची दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.या विभागासाठीच एकच आदर्श शैक्षणिक दिनदर्शिका (कॅलेंडर) निर्माण केली जात आहे.

नव्या वर्षापासून या शैक्षणिक दिनदर्शिकेची अंमलबजावणी होणार आहे.शैक्षणिक दिनदर्शिका म्हणजे पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन असून त्याचा उद्देश विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ करणे हा आहे.

Education Calendar 2023

शिक्षण आयुक्त श्री.सूरज मांढरे यांनी शालेय शिक्षण विभागाचासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आराखडा तयार केला असून,टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणीही केली जाते आहे.

अधिकाऱ्यांच्या डायऱ्यांपाठापोठ आता प्रत्येक कार्यालयाचे महिनानिहाय वर्षभराचे शैक्षणिक कॅलेंडर  तयार करण्यासाठी विविध कार्यालयांकडून माहिती जमा करण्यात आली होती.

शालेय शिक्षण दिनदर्शिका महाराष्ट्र

“शालेय शिक्षण दिनदर्शिका महाराष्ट्र” मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने संदर्भातील महत्त्वाची माहिती दोन नंबरच्या पेजवर छापण्यात आलेली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालय विद्यार्थ्यासंदर्भात कोणकोणत्या योजना राबवते? त्यांचा उद्देश,लाभार्थी,आर्थिक तरतूद आणि उपक्रमाचे स्वरूप हे देखील सदर दिनदर्शिका मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Leave a Comment