Close Visit Mhshetkari

Edible oil news : खाद्यतेलाच्या किंमतीत मोठा बदल ! पहा प्रतिलिटर नवीन भाव

Edible oil news : भारतात ऑगस्टपासून सणासुदीच्या कार्यक्रमांना सुरूवात होते.या पार्श्वभूमिवर सरकारकडून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असतो.

दरम्यान रोजच्या जेवणात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. परंतु भविष्यात दर वाढण्याची शक्यता आहे.

Edible Oil new Prices

फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण कमी पावसामुळे देशातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. असे असले तरी खाद्यतेल कंपन्यांच्या दरात वाढ होणार नसल्याची माहिती तेल कंपन्यांकडून मिळत आहे.

मित्रांनो सध्या खाद्य तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. परिणामी घरातील गृहिणींना याचा खूप फटका बसत आहे. पाहूया खाद्य तेल प्रति लिटर भाव…

  • शेंगदाणा तेल 175 – 180
  • करडई तेल 194 – 210
  • सोयाबीन तेल 104 – 116
  • सूर्यफूल तेल 114 – 126
  • सरकी तेल 104 – 104
  • पाम तेल 105 – 105
  • तीळ तेल 200 – 220

Leave a Comment