Close Visit Mhshetkari

Dussehra puja : विजया दशमी शुभमुहुर्त,दसरा सणाचे महत्व,पूजा विधी

Dussehra : शास्त्रात दसरा सणाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, दसरा दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रामाने माता सीतेची रावणाच्या तावडीतून सुटका करून रावणाचा वध केला.

या दिवशी रावण, मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. तसेच या दिवशी शस्त्र आणि शस्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात,दसऱ्याची नेमकी तारीख आणि महत्त्व जाणून घेऊ.

Dussehra Vijaydashmi

नवरात्रीची सांगता, रावण दहन आणि दिवाळीची चाहूल घेऊन येणारा दसरा यंदा 4 ऑक्टोबर रोजी आहे. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी शिक्षणाची, नवीन कार्याची, मंगल कार्याची नांदी सुरू होते. दिवाळीचे वेध लागतात.

आपापसातील मतभेद विसरून, आपट्याची पाने देऊन जुन्या नात्यांना सोनेरी झळाळी दिली जाते, तो हाच सोनेरी दिवस. या दिवशी कोणते विधी केले जातात, कोणते सोपस्कार पार पाडले जातात, नवीन वस्तू किंवा वास्तू खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते, सविस्तर जाणून घेऊ.

Dussehra Puja Muhurat

आश्विन शुक्ल दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते. यावेळी आश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.20 पासून सुरू होईल. बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दशमी तिथी समाप्त होईल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:07 ते 2:54 पर्यंत असेल. पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2.13 ते 3 पर्यंत आहे.

शस्त्र पूजनाची वेळ :

दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ.

अभिजित मुहूर्त – सकाळी ११. ४३ ते दुपारी १२.३० पर्यंत.विजय मुहूर्त – दुपारी २.०१ दुपारी ते दुपारी २.४७ पर्यंत अमृत काल मुहूर्त – संध्याकाळी ६.४४ ते रात्री ८.२७ पर्यंत.

विजया दशमीचा पुजा विधी काय आहे ?

ह्या दिवशी आपण लवकर उठायला हवे तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांनी देखील लवकर उठावे आणि सगळयांना अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.

हे पण पहा --  Dussehra puja : कधी आहे दसरा शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा,विधी,कथा संपूर्ण माहिती

सर्वात आधी सर्व शस्त्र नीट व्यवस्थित पुसुन स्वच्छ करून घ्यावी आणि मग ती सर्व पुजेसाठी एका ठिकाणी जमा करावी.

त्यानंतर सर्व शस्त्रांवर गंगाजलाचा शिडकाव करावा ह्याने सर्व शस्त्रे पवित्र होत असतात.

Vijayadashami marathi mahiti

दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ. Vijayadashami marathi mahiti

>> दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.

>> या दिवशी शस्त्रांच्या पूजेला खूप महत्व आहे.

>> या दिवशी महिषासुरला माता दुर्गेने आणि रावणाला श्री रामाने मारले, म्हणून त्या दोहोंचे पूजन केले जाते.

>> या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याची पाने देण्याची परंपरा आहे.

>> या दिवशी काही नवीन काम करण्याची, खरेदी करण्याची, नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे.

>> या दिवशी गोर गरिबांना भेटवस्तू, उपयुक्त सामान, अन्नधान्य तसेच मिठाई दान दिली जाते.

>> या दिवशी कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना वाकून नमस्कार केला जातो व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.

>> या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवून नऊ दिवसाच्या उपासाचे पारणे फेडले जाते.

>> अनेक ठिकाणी रावणदहन करून या दिवशी फटाकेही सोडले जातात.

>> दसऱ्याच्या दिवशी, परस्पर वैर विसरून, आपट्याची पाने देऊन नव्याने संबंध प्रस्थापित केले जातात.

दसऱ्याचे महत्त्व –

दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी अहंकारी रावणाचा वध ( Ravanacha Slaughter ) केला. त्याच्या आनंदात या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा ( Lord Sri Ramachi Puja ) केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते.

चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment