Driving Licence Online : ड्रायव्हिंग लायसन म्हणजे आपल्या सरकारने जारी केलेला एक परिवहन परवाना आहे त्याचा उपयोग आपण वाहन चालवण्यासाठी करत असत. ड्रायविंग लायसन हे RTO चे हेलपाटे मारता घरबसल्या काढता येते.पहा सविस्तर माहिती
How To Apply For A Driving Licence
घरबसल्या बनवून घ्या नवीन लायसन्स,लायसन्ससह तुम्ही पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील ऑनलाइन अर्ज करू शकता.फॉर्म सोप्या पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही Aadhaar eKYC चा वापर करू शकता.ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता,याची पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
- यासाठी सर्वात प्रथम https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan# या साइटवर जा. येथे तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसेजमध्ये Driving License Related Services पर्याय निवडावा लागेल.
- आता तुम्हाला ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये Apply For Learner License वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही eKYC आधारचा वापर केल्यास टेस्टसाठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या लर्नर लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही येथे non-Aadhaar eKYC पर्याय निवडल्यास आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल.
- येथे तुम्हाला Aadhaar Authentication पर्याय निवडून आधार नंबर द्यावा लगेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. हा नंबर व्हेरिफाय करा. आता Aadhar eKYC द्वारे तुमची माहिती आपोआप भरली जाईल.
- जर तुम्ही non-Aadhaar eKYC पर्याय निवडला असल्यास फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉग इन करावे लागेल. येथे तुम्हाला Applicant does not hold Driving/ Learner Licence पर्याय निवडून तुमच्या जवळील आरटीओची निवड करावी लागेल. यानंतर इतर माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा. आता स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्टसाठी स्लॉट बुक करा.
Online driving licence process
ऑनलाइन टेस्टसाठी लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळतील.ऑफलाइन टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला Print Learner License पर्यायावर जाऊन डाउनलोड करू शकता.
डायव्हिंग लायसन्स हरवल्यास काय करावे
1) मित्रांनो,आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असल्यास सर्वप्रथम आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावे तेथे जाऊन आपण आपल्या हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन बद्दल तक्रार दाखल करावी.
2) तक्रार नोंदविल्यानंतर त्या तक्रारीचे एक प्रत आपल्याजवळ सुरक्षित ठेवावी.त्यानंतर आपण आपल्या नोटरी कार्यालयामध्ये जावे आणि एक प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावे ज्यामध्ये असे लिहिले जाईल की आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे.