Close Visit Mhshetkari

Diwali package : शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! रेशनवर 100 रुपयांत मिळणार रवा, चणा डाळ, साखर आणि तेल

Diwali package : राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आल्या असून राज्यातील राज्यातील जनतेला सरकारने मोठी दिवाळी गिफ्ट दिलेले आहे.राज्यातील जनतेला आता दीवळीनिमित्त शंभर रुपयांमध्ये रेशन मिळणार असून यामध्ये चार महत्त्वाच्या वस्तूचा समावेश आहे.

Diwali package for ration card holder

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली मध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले पण त्यातला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने एक कोटी 62 लाख कार्ड धारकांना म्हणजे सात कोटी लोकांना आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे या चार वस्तू मध्ये रवा, चणाडाळ आहे तेल आहे आणि त्याच्यासोबत या ठिकाणी साखर आहे अशा चार गोष्टी या देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे केवळ शंभर रुपयांमध्ये या चारही गोष्टी पॅक करून सरकार त्या ठिकाणी देणार आहेत.

रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट आणले आहे.शिधा पत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज मिळणार आहे. रवा, चणाडाळ, साखर यांचे प्रत्येकी एक-एक किलो, तर एक लीटर तेल असे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड जाणार आहे.

रेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज

१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

१०० रुपयांत नेमके काय काय मिळणार!

प्रत्येकी एक किलो रवा,चणाडाळ,साखर व तेल केवळ शंभर रुपयांत देणार असून सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. यानिमित्ताने राज्यातील गरिब जनतेची दिवाळी गोड होणार आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment