Close Visit Mhshetkari

Diwali Date : यंदा दिवाळीत कोणता सण कधी? वसुबारस ते भाऊबीज जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

Diwali 2022 Date : दिवाळी सण हा पाच दिवस पाच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केल्याजातो.या सणाला दीपोत्सव देखील साजरा केला जातो.यंदा दिवाळीत कोणता सण कधी?वसुबारस ते भाऊबीज जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त सर्व माहिती.

वसुबारस 2022 शुभ मुहूर्त

दरवर्षी अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस (Vasubaras) सण साजरा केला जातो.यंदा सूर्योदय सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी होणार असून 21 ऑक्टोबर रोजी (Vasubaras 2022 date) वसुबारस साजरा केला जाणार आहे.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त

अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhantrayodashi) सण साजरा केला जातो.यावर्षी 22 ऑक्टोबर 2022 रोजी आहे.यावर्षी शनिवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 06 वाजून 03 मिनिटापासून साजरी केली जात असून आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटा पर्यंत राहील.

नरक चतुर्दशी 2023 शुभ मुहूर्त

नरक चतुर्दशी आरंभ : 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 06:03 वाजता
नरक चतुर्दशी समाप्ती : 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 05:27 वाजता
उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर रोजी सोमवारी साजरी केली जाईल.

हे पण पहा --  Diwali : यंदा कधी आहे दिवाळी? जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त,साहीत्य,कथा आणि विधी

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार,दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो.वर्ष 2022 मध्ये कार्तिक अमावस्येची तारीख गुरुवार,24 रोजी दिवाळी साजरी करण्याचा शुभमुहूर्त आहे.

लक्ष्मी पूजन मुहूर्त: संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 (24 ऑक्टोबर 2022. सोमवार)
अमृत ​​काल मुहूर्त: सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)

दिवाळी पाडवा शुभमुहूर्त (Diwali Padwa 2022 Date)

दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी पाडवा हा सण साजरा केला जातो. दिवाली उत्सवाचा हा चौथा दिवस पती-पत्नीमधील प्रेमाला समर्पित आहे. या दिवशी पुरुष त्यांच्या पत्नीसाठी भेटवस्तू खरेदी करतात. तसेच अनेक व्यवसायीक या दिवशी नवीन खाती उघडतात कारण हा दिवस शुभ मानला जातो.

भाऊबीज शुभ मुहूर्त

भाऊबीज हा सण कार्तिक शुक्ल 2 तारीख 27 ऑक्टोबर 2022 वार गुरुवार रोजी आहे.तसेच भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु होणार असून तो दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी संपणार आहे.या 2 तास 32 मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर भावाला ओवाळावे.

Leave a Comment