Close Visit Mhshetkari

Dearness allowance : महागाई भत्ता वाढीवरून 1 कोटी कर्मचारी,पेन्शनधारक संभ्रमात; पहा इतका वाढणार डीए ..

Dearness allowance : ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) आणि कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स (CFPI) अंतर्गत जारी केलेल्या आकडेवारीनुसार कामगारांचा महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच, कर्मचार्‍यांचा DA-DR चा दर 45 किंवा 46 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

DA hike latest Update

फूड प्राइस इंडेक्स (CFPI) अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून कामगारांचा महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच, कर्मचार्‍यांचा DA-DR चा दर 45 किंवा 46 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ घेईल.

निर्देशांकांतर्गत, जुलै 2023 (तात्पुरती) आणि जून 2023 (अंतिम) दरम्यान शहरी आणि ग्रामीण भागांसाठी CPI (सामान्य) मध्ये 2.93 टक्क्यांचा एकत्रित बदल दिसून आला आहे. त्याचप्रमाणे, CFPI चा एकत्रित मासिक बदल 6 आहे.

जुलैमध्ये सीपीआय दर 7.44 %

सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै 2023 मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) मध्ये महागाईचा दर (तात्पुरता), शहरी आणि ग्रामीण भागांसह अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) खालील प्रमाणे होते.

  • जून 2023 मध्ये एकत्रित CPI दर (अंतिम) 4.87 टक्के होता.
  • जुलै 2022 मध्ये हाच एकत्रित दर 6.71 टक्के होता.
  • जून 2023 (अंतिम) साठी एकत्रित CFPI दर 4.55 टक्के होता.
  • जुलै 2023 (तात्पुरती) साठी ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CFPI) चा एकत्रित दर 11.51 होता
  • जुलै 2022 मध्ये एकत्रित CFPI दर 6.69 टक्के होता.
  • जुलै 2023 साठी (तात्पुरती) महागाईचा दर शहरी आणि ग्रामीण भागांसह 7.44 टक्के आहे.
  • CFPI मासिक बदल 6.66 टक्के होता.
हे पण पहा --  7th pay : बक्षी समिती अहवाल,सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आणि जुनी पेंशन संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक

सांख्यिकी कार्यालयानुसार, निर्देशांकांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांसाठी जुलै 2023 (तात्पुरती) साठी एकत्रित CPI दर 186.3 टक्के आहे. जून 2023 मध्ये एकत्रित CPI दर (अंतिम) 181.0 टक्के होता. जुलै 2022 मध्ये हाच एकत्रित दर 173.4 टक्के होता.

महागाई भत्ता वाढणार

जुलै 2023 (तात्पुरत्या) साठी ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CFPI) चा एकत्रित दर 193.8 होता. जून 2023 मध्ये एकत्रित CFPI दर (अंतिम) 181.7 टक्के होता. जुलै 2022 मध्ये एकत्रित CFPI दर 173.8 टक्के होता. जून 2023 च्या तुलनेत जुलै 2023 साठी अखिल भारतीय ग्राहक CPI (सामान्य) आणि CFPI मध्ये मासिक बदल दिसून आला.

माहे जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्तामध्ये 4 % वाढ निश्चित केली गेली जाणार आहे. सदरील वाढीमुळे DA/DR दर 46 टक्क्यांवर जाईल.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 46 % डीए/डीआर वाढ फाइलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment