वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय हवामान विभागाने दामिनी नावाचे ॲप तयार केले आहे. या ॲपमधून हवामानाविषयी महत्त्वाची माहिती मिळतेच,सोबत वीज पडण्याच्या आधीच १५ मिनिटे अलर्टदेखील मिळतो.या लेखात पाहूया सविस्तर माहिती.
|
lightning Alert app |
दामिनी मोबाईल ॲप
मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीतहानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले असून सदरचे ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे.
करीता सुरक्षात्मक उपाय योजना म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी/ कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी मंडळ अधिकारी,अव्वल कारकुन महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करणेबाबत सुचना शासनाच्या वतीने करण्यात येत आहे तसेच सदरचे ॲप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापुर्वी सदरच्या अँपमध्ये स्थिती दर्शविते.
ॲप मध्ये आपले सभोवताली विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात याले आहे.तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे याबाबतचा सूचना निर्गमित करण्यात आले आहे.अॅपमध्ये वीज पडल्यास प्रतिबंध आणि सुरक्षा उपायांसह प्रथमोपचाराची माहिती देखील खाली दिली आहे.विज पडणे ही प्रतिकूल हवामानाची स्थिती आहे,जी मानव व प्राण्यांसाठी घातक आहे.हे थांबवता शक्य नाही,परंतु सतर्कता प्राप्त करून आणि दामिनी ॲपद्वारे वादळाचा अंदाज वर्तवल्यास जिवित आणि वित्तहानी टाळता येऊ शकते.
दामिनी ॲप कसे डाउनलोड करावे
दामिनी ॲप डाऊनलोड करण्याबाबत माहिती देताना पंतनगर विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉ.आर.के.सिंग म्हणाले की, ‘दामिनी अँप तुमच्या मोबाइलवर प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते. डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यात नोंदणी करावी. यामध्ये त्यांना त्यांचे नाव आणि ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. ही माहिती टाकताच, हे ॲप ठिकाणापासून ४० किमीच्या परिघात विजेचा संबधित माहिती आणि एसएमएस अलर्ट देईल.
ॲपद्वारे वीज कुठे कधी आणि किती रेडिएशनने पडणार आहे. याचा १५ ते २० ते. मिनिटे आधी अलर्ट येतो, लगेच विभागाकडून त्या भागातील नागरिकांना पब्लिक ॲड्रेस सिस्टीम तसेच प्रशासनाच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. त्यामुळे अनेक प्राण व होणारे नुकसान टाळता आला. नागरिक फोन करून उपयोग झाला, अशी माहिती देतात.
• दामिनी ॲपवरून इशारा मिळाल्यावर वीज पडून होणरी हानी टाळण्यासाठी मोकळ्या शेतात,झाडांखाली,डोंगराळ भागात, खडकांचा आश्रय घेऊ नका.
• धातूची भांडी धुवू नका आणि आंघोळ वगैरे टाळा. लवकरात लवकर घरी जावे.लवकरात लवकर घरी जाणे शक्य नसेल,तर मोकळ्या जागेवर कान गुडघ्यांवर बंद करून बसावे.
• छत्री कधीही वापरू नका.तसेच हाय टेंशन वायर्स आणि टॉवर्सपासून दूर राहावे.
• वीज वेगाने खाली येताना उच असलेल्या गोष्टींवर आधी आवळते.
• पाऊस पडत असला की अनेकजण झाडाखाली आश्रय घेतात; पण झाड उंच असल्याने त्यावर वीज कोसळून माणसांचा मृत्यू होतो.त्यामुळे विजा चमकत असतील तर झाड, टेकडीचा उंच भाग, उंच इमारतीच्या खाली आश्रयाला जाऊ नका,
• जवळच घर असेल तर तेथे जा. नाहीतर मोकळ्या मैदानात थांबा.
• विजा कडकडत असतील, यादळी पाऊस असेल तर घराबाहेर पडणे टाळा.
• शेतातले खांब, विजेचे खांब, भिंतींचा आधार घेऊ नका.