Government employeesDA Hike update : सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.जानेवारी 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा होती.पण आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
DA Hike Latest Updates
मार्च महिन्यात म्हणजे होळी सणाचे औचित्य साधून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे.यामध्ये जानेवारी पासुन प्रत्यक्ष वाढ लागु करुन डी.ए थकबाकीची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे.
होळी सणाला म्हणजेच माहे मार्च महिन्याच्या वेतनासोबत प्रत्यक्ष रोखीने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येईल.
7th pay commission news
भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंकांवर होता.सप्टेंबरमध्ये तो 131.3 अंकांवर होता.ऑक्टोबरमध्येही AICPI निर्देशांकाचा आकडा 132.5 होता.
ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही.AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्यांसाठी अंतर्गत DA भत्ता मार्ग मोकळा झाला आहे.
महागाई भत्ता किती वाढणार?
AICPI निर्देशांकामध्ये यावेळी कोणतीही वाढ झाली नसल्याने जो महागाई भत्ता 4 % नी वाढण्याची अपेक्षा होती,ती आता राहिलेली नाही.
त्यामुळे आता कमी वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे,त्यामुळे आता या स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केवळ 3% वाढ होणार आहे.