Close Visit Mhshetkari

Crop insurance : शेतकऱ्यांना मिळणार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणार मंत्रीमंडळ निर्णय

Crop insurance: नमस्कार मित्रांनो जसे की आपल्याला माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे. आणि यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

संपूर्ण राज्यांमध्ये झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जवळपास दीड लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आपल्याला दिसून येत आहे.
ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून तीन हेक्टर पर्यंत मदतदिली जाणार आहे.

पावसामुळे कापसाचे नुकसान

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. व शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे .असे घोषित करण्यात आले .

संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर पंचनामे सादर करावे. अशा सूचना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची दाट शक्यता आहे.
कापूस, मका, तूर इत्यादी पिकांचे या पावसामुळे नुकसान झालेले आहे.

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये खरीप अंगामध्ये पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक पूर्णपणे गेली होती. तरी पण सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपले पिक उभे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो सुद्धा अवकाळी पाऊस व वारा यामुळे पूर्ण पणे शेतकऱ्यांच्या हातातून निसटून गेले. असल्यामुळे अनेक शेतकरी आता चिंतेत पडले आहेत.

हे पण पहा --  Loan Waiver : 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दुसरी - तिसरी याद्या आल्या 'या' दिवशी जमा होणार पैसे

या सर्व या सर्व गोष्टीचा विचार करता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलण्यात आले असून पिकाचे झालेल्या नासाडीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले आहे.

शेतीला पूरक असा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी वर्ग अगोदरच हवालदीर झाला होता. आणि अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे शेतकरी वर्ग अजूनच संकटात सापडला गेला .पूर्णपणे नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची ही प्रक्रिया आता युद्ध पातळी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

पिक नुकसान भरपाई कधी मिळणार?

अनेक शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम खात्यामध्ये जमा झालेली असली तरी बरेच शेतकरी पिक विमा पासून वंचित असल्याचे माहितीस पडत आहे मात्र पुढील दोन ते तीन दिवसात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

पिकांचे नुकसान झाले असल्यास द्या पिक विमा कंपनीस सूचना

तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर ७२ तासाच्या पिक विमा कंपनीस या संदर्भात माहिती कळविणे आवश्यक असते.

Leave a Comment