Close Visit Mhshetkari

Crop insurance : गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे? अशी करा ऑनलाईन विमा तक्रार

Crop insurance : महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष बागा आणि उसाचे उभे पीक झोपले असून भाजीपाला पीके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवायची असेल, तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने विम्याची तक्रार करणे आवश्यक आहे. घटना किंवा नुकसान झाल्यानंतर ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत ही तक्रार करणे आवश्यक असते. 

Crop insurance claim online process

ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

  1. आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) नावाचे अॅप डाऊनलोड करा.
  2. आपल्याला जी भाषा योग्य वाटेल ती निवडावी
  3. आता चार पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ हा पर्याय निवडावा.
  4. त्यानंतर पाच पर्यायापैकी ‘पीक नुकसान’ हा पर्याय निवडा
  5. त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील
  6. त्यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडा.
  7. विमा भरताना दिलेला मोबाईल नंबर टाका.
  8. ओटीपी आल्यावर ओटीपी टाकून सबमिट करा
  9. आता हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरवी
  10. ‘नोंदणीचा स्रोत’ या रकान्यामध्ये सीएससी सेंटर, ऑनलाईन मोबाईलवरून वैगरे टाका.
  11. विमा फॉर्मवरील पॉलिसी क्रमांक टाकावा.
  12. आता आपल्याला विम्याची संपूर्ण माहिती दिसेल कोणत्या पिकाचे नुकसान झाले ते निवडा
  13. निवडल्यानंतर फोनवरील लोकेशनचे अॅक्सेस अॅपला द्या.
  14. तपशीलामध्ये घटनेचा प्रकार, घटनेचा दिनांक, घटनेच्या वेळेस पिक वाढीचा टप्पा, नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, फोटो, व्हिडिओ अशी माहिती टाकायची आहे. 
  15. शेवटी’सादर करा’ या बटणावर क्लिक करा
हे पण पहा --  Crop insurance : मोठी बातमी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर! शासन निर्णय निर्गमित .. पहा यादी

पीक विमा ऑनलाईन तक्रार करण्यासाठी ऍप येथे डाऊनलोड करा 

Crop insurance

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment