Close Visit Mhshetkari

Cotton Verity : कापसाच्या या वाणाची उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू जमिनीसाठी होतेय शिफारस

Cotton Verity  :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नवीन कापूस वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षाच्या परिश्रमानंतर आणि संशोधनानंतर कापसाचे एन.एच.१९०१, एन. एच. १९०२ व एन. एच. १९०४ हे तीन बीटी वाण विकसित केले आहेत.कापसाच्या सदरील वाणाची कोरडवाहू जमिनीसाठी उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल सांगितली जात आहे.

New Cotton variaty

सदर वाणाची केंद्रीय वाण प्रसारण समितीच्या वतीने मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली असून, हे वाण लवकरच बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

कपाशीचे हे वाण सरळ वाण प्रकारात असल्यामुळे त्याच्या बियाण्यासाठी बाजारातून खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. – ए. डी. पांडागळे कृषी विद्यावेता, कापूस संशोधन केंद्र नांदेड

नांदेड कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेले तीनही वाण हे बीटी स्वरुपातील असल्यामुळे यावर हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी यांना प्रतिकाकारक राहतील. – डी.के.एस. बेग कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र नांदेड

हे पण पहा --  Cotton farming यावर्षी कसे असतील कापूस बाजार भाव ? भाव वाढण्याचे कारणे काय आणि केव्हा विकावा कापूस पहा सविस्तर माहिती

कपाशीचे नविन वाण २०२४

कापूस संशोधन केंद्रात सन 2015 पासून या तिन्ही वाणावर संशोधन करण्यात येत होते. संबधित वाणाची लक्षणे बीटी स्वरूपातील असल्यामुळे सदरील वाण सरळ स्वरूपाचे आहे.

शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कपाशीपासून सरकी वेगळी करून पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येणार आहे.त्यामुळे प्रत्येक वर्षी बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता असणार नाही.बियाण्यांवरील खर्चही कमी करण्यास मदत होणार आहे.

कपाशी नाविन वाणाची वैशिष्ट्ये

कोरडवाहू क्षेत्रासाठी हे वाण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. हे वाण रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील असून, त्याच्या धाग्याची लांबी मध्यम स्वरूपाची आहे. हे वाण कोरडवाहू आहेत. या वाणाची लक्षणे BT cotton स्वरुपातील सरळ वाण असून, नांदेड संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले आहे.

  • हेक्टरी उत्पादकता १६ ते १८ क्विंटल
  • कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रस्तावित
  • रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील
  • धाग्याची लांबी मध्यम स्वरुपाची
  • कोरडवाहू भागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment