Close Visit Mhshetkari

कपाशी वर पाचवी फवारणी हिच करा : cotton spray

Cotton spray : सध्यस्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झालेली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.आता कपाशीची ही पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक असते जेणे करून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल.त्यासाठी कपाशी वर पाचवी फवारणी कोणती करावी हे आपण पाहणार आहोत.

kapus pachavi favarni

मित्रांनो कपाशी वर आता फवारणीसाठी महागडी औषधे वापरायची ची गरज नसून खालील सांगितलेली औषधी ही कमी किमतीची आणि जबरदस्त रिझल्ट देणारी आहेत.खालील औषधांची “कापूस पाचवी फवारणी | kapus pachavi favarni” केल्यास थ्रिप्स,पांढरी माशी, मावा, तुडतुडे अशा रस शोषणाऱ्या किडींवरती आणि इतर किडींवरती नियंत्रण होईल.यासोबतच पानांची फुलांची चांगली वाढ होऊन कपाशीच्या झाडावर भरपूर पाने – फुले लागतील.

कपाशीवर जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आला तसेच पांढरी माशी, मावा,तुडतुडे थ्रीप्स यांचा प्रभाव कमी करण्यासाठी कपाशी वर पाचवी किटकनाशक वापरावी.तसेच कपाशीच्या झाडाची वाढ काही दिवस थांबवण्यासाठी,पाते लागण्यासाठी,पते गळ थांबवण्यासाठी एक टॉनिक वापरावे.या बरोबरच एका बुरशी नाटकाचा सामावेश करावा.जसे की –

कपाशी पाचवी फवारणी

कापूस पाचवी फवारणी | kapashi pachavi favarni कीटकनाशक औषध प्रमाण : 20 लिटर पंपासाठी cotton spray

हे पण पहा --  Last cotton spray : कपाशीवर महत्वाची आणि शेवटची फवारणी कोणती करावी?

• वाढ रोधक संजीवनी – दापोली किंवा चमत्कार किंवा लियोसिन (25 ग्रॅम)

•• विद्राव्य खत – 13:0:45 किंवा 13:40 :13

•• बुरशीनाशक – साफ/ अवतार (40 ग्रॅम)

•• सिलिकॉन बेस -स्टिकर्स

•• किटकनाशक – प्रोफेक्स सुपर किंवा रोगर किंवा उलाला

किंवा

>> रिजेन्ट (40ml) + अँसिटामिप्रीड 20% (15 ग्रॅम) + इसाबियन किंवा टाटा बहार (एकरी खर्च साधारणपणे 750-800 रूपये )

किंवा

>> रिजेन्ट (40ml) + पोलो (25ग्रँम) + इसाबियन किंवा टाटा बहार (एकरी खर्च साधारणपणे 900-1000 रूपये )

Insecticide Spray of Cotton

टीप- सल्फर व कॉपर एकत्र किंवा दुसऱ्या कीटकनाशकांसबोत वापरू नका. इतर सर्वांचा वापर सुद्धा तपासणी केल्यानंतरच फवारणी करावी,द्रावण घट्ट झाल्यास फाटल्यास योग्य मिश्रण न झाल्यास न विरघळल्यास फवारू नका.

एखादा घटक अयोग्य असल्याने असे होऊ शकते.वरील क्रमवारीनुसार पाण्यात मिसळणे फायद्याचे ठरते. मात्र, प्रत्येक वेळेस हे सर्वच फवारावे असे नाही. शक्य झाल्यास एका पंपाचे मिश्रण तयार करून ते योग्य सिद्ध झाल्यास 200 लिटर पाण्यात द्रावण तयार करावे.

1 thought on “कपाशी वर पाचवी फवारणी हिच करा : cotton spray”

Leave a Comment