Cotton session : देशात मागील पाच दिवसांपासून पाऊस उघडला आहे त्यामुळे कापूस वेचणीच्या कामांना वेग आला असून कापड उद्योगाने यंदा उत्पादन जास्त राहील,असे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात पावसाने जास्त नुकसान आहे,त्यामुळे उत्पादन कमीच राहील,असे शेतकरी सांगत आहेत
कापूस उत्पादन सध्यस्थिती
जागतिक पातळीवर मागील काही महिन्यांपासून कापड उद्योग अडचणीत होते.महागाई हे त्याचे मूळ कारण होते.मात्र आता भारतासह काही देशांमध्ये परिस्थिती सुधारत असून भारत आणि इतर महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सणासुदीला कापडाची मागणी वाढते.पुढील महिनाभरात जागतिक कापड बाजार सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
पाकिस्तान मधील कापूस परिस्थिती
पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होईल.त्याचे प्रतिबिंब सध्या बाजारात जाणवत आहे. मागील दशकातील कापूस उत्पादन कमी राहण्याची ही दुसरी वेळ आहे.पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंतचं सर्वाधिक कापूस उत्पादन सात वर्षांपुर्वी १५० लाख गाठींचे झाले होते. यंदा पाकिस्तानमध्ये लागवडही कमी झाली होती.पाकिस्तानाला मॉन्सूनचा कापूस पिकाला मोठा फटका दिला.
Global Cotton farming
उत्तर भारतात पूर्वहंगामी कापसाची आवक सप्टेंबर महिन्यापासून सुरु झाली होती.मे महिन्यातील लागवडी सप्टेंबरमध्येची वेचणीला आल्या होत्या.त्यामुळे पंजाब,हरियाना आणि राजस्थान या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये लवकर आवक झाली. मात्र यंदा या तिन्ही राज्यांमध्ये कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट झाले आहे.Global Cotton farming
Cotton crop session
सप्टेंबर महिन्यात दक्षिण अमेरिका आणि युरोपियन युनियनमधून काही प्रकारच्या कपड्यांना मागणी वाढली होती.तर भारतात दिवाळीच्या सणामुळे कापड बाजाराला उभारी मिळाली यंदा दिवाळी ऑक्टोबरमध्येच आली.त्यामुळे ऐन कापूस आवकेच्या हंगामात कापडालाही उठाव मिळतोय.
ऑक्टोबर महिन्यातील कापडाची मागणी जास्तच असेल.त्याचा तपशील पुढील महिन्यात येईल.तर आंतरराष्ट्रीय बाजारातही पुढील महिन्यापासून कापडाला उठाव मिळण्याची शक्यता आहे.असे झाल्यास कापसालाही मागणी वाढेल.या काळात कापूस दरालाही आधार मिळेल,असं जाणकार सांगत आहेत.