Cotton rate : गतवर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात दर गगणाला पोहचले होते. कधी नव्हे तो कापसाला तब्बल 14 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता.कापूस दर कायम वर्षभर टिकूनही राहिला.यंदा पण मध्ये अशीच वाढ राहणार असल्याचे चित्र आहे.
हीच बाब ओळखून कमी दरात कापूस मिळावा म्हणून गावखेड्यात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केले जात आहे.
Cotton booking |
व्यापाऱ्यांकडून कापसाचे सौदे सूरू
कापूस उत्पादनात होणारी घट आणि कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव याचा अंदाज घेत कापूस गाठी पुरविण्याचे सौदे घेणारे व्यापारी आतापासून तयारी कामाला लागले आहे.या व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठण्यास सुरुवात केली आहे आणि खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत.त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे.11 ते 16 हजार रुपये क्विंटल दराने टोकन शेतकऱ्यांना दिले जात आहे तसेच यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस मिळविण्याचा मार्ग व्यापाऱ्यांनी मोकळा केला आहे.
Cotton Prices in India
मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात येऊ लागला आहे.गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या(Cotton) खरेदीचा शुभारंभ झाला आहे.गणेश चतुर्थीच्या दिवशी ११ हजार ते १६ हजार रुपये क्विंटल पर्यंतचे दर विविध बाजारपेठेत राहिले आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस बाजारपेठेत येण्यास अजून अवधी आहे.
आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात घट
कापूस उत्पादक देशांमध्ये दुष्काळजन्य परस्थिती असल्याने उत्पादनात घट निश्चित मानली जातेय. बाजारपेठेतील मागणी आणि आयातीत घट होणार असल्याने यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव राहणार हे निश्चित.या स्थितीचा सर्वाधिक फायदा भारतामधील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण हंगामाच्या सुरवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला असला तरी आता कापूस पीक जोमात आहे.
अमेरिकेत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकेत 25 लाख गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कापसाची गाठ ही 170 किलोची असते. इतर देशांमध्ये उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होणार आहे.त्याचा फायदा भारतीय व्यापारी आणि शेतकऱ्यांना देखील होणार आहे.बाजार समित्यांमध्ये आताच कापसाला 10 हजार 300 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.
भारताकडून कापसाची निर्यात वाढणार
निर्यातीमध्ये आघाडीवर असलेले अमेरिका राष्ट्र यंदा पिछाडीवर राहणार. तर भारत देशाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम या देशांना भारताकडून कापसाची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत वजन आणि वाढीव दरही असा दुहेरी फायदा भारताला होणार आहे