Close Visit Mhshetkari

Cotton price : कापसात यावर्षी पण तेजी राहणार का ?

Cotton price : देशात सध्या कापूस दर स्थिर आहेत.परंतु पुढे नोव्हेंबरमध्ये तेजी येईल जी टिकून राहील का? देशात कापसाची मागणी कायम राखण्यासाठी सूतगिरण्यांनाही वित्तीय सहायता वाढवावी सरकार करेल का? या सगळ्या परिस्थितीत कापूस बाजार भाव तेजीत राहतील का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.तर चला पाहूया कशी असेल परिस्थिती.

कापूस बाजार भाव

Cotton pric : देशात कापूस सुताच्या किंमतीत (Cotton Yarn Rate) पुन्हा घट पाहायला मिळत आहे.पण सुताचे दर कमी झाल्यानंतर या दरात मागणी वाढण्याची शक्यता असल्याचंही काही जाणकारांचे म्हणणे आहे.सध्या भारतातील कापूस दर हे पाकिस्तानमधील दरापेक्षा कमी झाले आहेत.यामुळेही भारतीय कापूस आणि सुताला मागणी वाढू शकते.देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या कापसाची आवक वाढत आहे.तर दरही काहीसे नरमले आहेत. उद्योगांनी यंदा कापूस उत्पादन वाढेल,मात्र शेतकऱ्यांच्या मते पिकाचे नुकसान जास्त असल्याने उत्पादन गेल्यावर्षीएवढेच राहील.

दुसरीकडे कापड उद्योगात मागणी नव्हती.कपड्यांना मागणी कमी असल्याने मागील महिन्यापर्यंत सुताला उठाव कमी होता. सुताला हळूहळू मागणी वाढत असली तरी मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही.त्यामुळे सुताचे दर दबावातच आहेत.पण आता कपड्यांना सणांमध्ये उठाव वाढतोय. त्यामुळे नरमलेल्या दरात सुताला उठाव मिळू शकतो,असा अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केरत आहेत.

ऑक्टोबरमध्ये कापूस बाजारात

मे मध्ये पूर्वहंगामी कापूस लागवड होते. हा कापूस सप्टेंबर अखेरीस बाजारात येत असतो. खरिपातील कापूस ऑक्टोबरच्या पंधरवडयात बाजारात दाखल होण्यास सुरवात होते.जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कापसाचे दर अनिश्चित राहतील परंतु कापूस बाजारात येईपर्यंत त्याविषयी सांगणे कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगभरात सध्याची स्थिती काय?

  सध्या जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक स्थिती चांगली नाही. अमेरिकेसह युरोप आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्था महागाईला तोंड देत आहेत. त्यामुळं गारमेंट म्हणजेच कपड्यांची मागणी कमी झाली. परिणामी कापड उद्योगाकडे मालाचा साठा वाढलाय. त्यामुळं सूत आणि कापसाला उठाव कमी दिसतोय. मात्र पुढील महिना दोन महिन्यांमध्ये ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सणांच्या काळात कपड्यांना मागणी वाढून कापसालाही उठाव मिळेल.

हे पण पहा --  Cotton Market : शासकीय कापूस खरेदी केंद्राअभावी कापूस शेतकऱ्यांना मोठा.. फटका

पाकिस्तानमधील कापड उद्योग काय म्हणतोय ?

पाकिस्तानमध्ये सध्या कापसाची टंचाई जाणवात आहे. सिंध आणि पंजाब प्रांतीतील कापूस आवक सुरु झाली.मात्र पिकाचे नुकसान जास्त असल्याने आवक जवळपास २० टक्क्यांपर्यंत कमी आहे.त्यामुळे कापसाचे दर तेजीत आहे.परिणामी अनेक सूतगिरण्या आणि कापड उद्योग अद्यापही बंदच आहे किंवा त्यांनी उत्पादन कमी केले आहे.कापसाची उपलब्धता वाढल्यास दर काहीसे आटोक्यात येऊन या उद्योगांना उत्पादन सुरु करणे शक्य होईल.मात्र अमेरिकेतूनही जास्त कापूस मिळण्याची शक्यता नाही.

भारत चीनकडून कापूस आयात करणार !

 भारत चीनकडून कापूस आयात केला जाणार,तसेच पॉलिस्टरचा वापर वाढणार अशा वार्ता देखील बाहेर पडत आहे.पण चीनमधील कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून त्यांनी अमेरिकेकडून कापूस मागणी केली आहे,जी अमेरिकेने अमान्य केली आहे.सोयाबीन मागील तीन महिन्यांत २५-३० टक्के घसरले असून,आज ते ५,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आले आहे.मागील हंगामातील १०,००० रुपयांच्या पातळीपासून निम्म्यावर आले असले,तरी हमीभावापेक्षा अजूनही २५ टक्के अधिक आहे. कापूसदेखील सोयाबीनच्या मार्गावर आहे,असे म्हणता येईल.

कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच

मंदीच्या देशांतर्गत कारणांचा विचार करता नेहमीप्रमाणेच उत्पादनाबाबतचे मोठे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. सोयाबीन उत्पादन १२०-१२५ लाख टन,तर कापसाचे उत्पादन ३७५ लाख गाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जाऊ लागली आहेत.महिन्याभरापूर्वी देशातील ओला आणि सुका दुष्काळ,त्यामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीमुळे चिंतीत झालेल्या घटकांकडूनच असे आकडे बाहेर येऊ लागल्यामुळे त्यावर कितपत विश्‍वास ठेवावा,असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. परंतु सोयाबीनचे शिल्लक साठे १७-२० लाख टन असल्याचे देखील बोलले जात आहे.या आकड्यांचा किमतीवर परिणाम झालाच असून,पुढील काळात सोयाबीन ४,५०० ते ४,७०० रुपयांवर घसरले तर आश्चर्य वाटायला नको.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment