Close Visit Mhshetkari

Cotton news : सीसीआयने कापूस खरेदीसाठी आणली नवीन प्रणाली; तर शेतकऱ्यांनी थांबविली कापूस विक्री! पहा बाजार भाव

Cotton news : राज्य शासनाने पणनमार्फत खरेदी बंद केली तर सीसीआयने आता कापसाची आधार बेस खरेदी सुरू केली आहे. ही प्रणाली यंदा पहिल्यांदाच राबवली जाणार आहे.ओलावा आणि लांबी पाहून कापसाला ७,०२० रुपये क्विंटलचा दर मिळणार आहे. अगोदरच कमी बाजार भावाने शेतकरी परेशान असतानाच आता सीसीआयने ऑनलाईन नोंदणीची टाकल्याने शेतकरी हवालदीर झाला आहे.

MCX Cotton market live

शेतकऱ्यांनी CCI केंद्रावर हमी दरावर कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. एवढे सोपस्कार पूर्ण केल्यावर शेतकऱ्याचा कापूस हा काट्यावर लावला जाईल व १५ दिवसांत पैसे खात्यात जमा होईल.

सध्या शेतकऱ्यांनी कापूस बाजार भाव नसल्याने कापूस विक्री थांबविली आहे. परिणामी बाजारातील कापसाची आवक घटली आहे.याचा परिणाम व्यवसायावर होत असून,कापसाअभावी जिनिंग बंद पडत आहेत.

पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील ८७२ पैकी तब्बल ५६९ म्हणजे ६५ टक्के जिनिंग बंद आहेत. सध्या २५३ जिनिंगवरच खरेदी सुरू आहे.

कापुस बाजार भाव

  • काटोल
    जात : लोकल
    आवक : 70
    कमीत कमी दर : 7000
    जास्तीत जास्त दर : 7100
    सर्वसाधारण दर : 7050
  • सिंदी(सेलू)
    आवक : 310
    कमीत कमी दर : 7125
    जास्तीत जास्त दर : 7200
    सर्वसाधारण दर : 7170
  • वर्धा
    जात : मध्यम स्टेपल
    कमीत कमी दर : 7000
    जास्तीत जास्त दर : 7200
    सर्वसाधारण दर : 7100
  • संगमनेर
    आवक: 135
    कमीत कमी दर: 6000
    जास्तीत जास्त दर: 7100
    सर्वसाधारण दर: 6550
  • सावनेर
    आवक: 2000
    कमीत कमी दर: 6950
    जास्तीत जास्त दर: 6950
    सर्वसाधारण दर: 6950
  • भद्रावती
    आवक: 120
    कमीत कमी दर: 7050
    जास्तीत जास्त दर: 7100
    सर्वसाधारण दर: 7075
  • समुद्रपूर
    आवक : 1170
    कमीत कमी दर : 7100
    जास्तीत जास्त दर : 7350
    सर्वसाधारण दर : 7200
  • हिंगणा
    आवक : 18
    कमीत कमी दर : 6825
    जास्तीत जास्त दर : 7050
    सर्वसाधारण दर : 6900
  • मारेगाव
    जात : एच-४ – मध्यम स्टेपल
    आवक : 873
    कमीत कमी दर : 6950
    जास्तीत जास्त दर : 7150
    सर्वसाधारण दर : 7050
  • पारशिवनी
    शेतमाल : कापूस
    जात : एच -४ – मध्यम स्टेपल
    आवक : 333
    कमीत कमी दर : 6950
    जास्तीत जास्त दर : 7050
    सर्वसाधारण दर : 7000
  • अकोला
    आवक : 75
    कमीत कमी दर: 7191
    जास्तीत जास्त दर: 7300
    सर्वसाधारण दर: 7200
  • अकोला (बोरगावमंजू)
    आवक : 40
    कमीत कमी दर : 7150
    जास्तीत जास्त दर : 7650
    सर्वसाधारण दर : 7400
  • वरोरा-माढेली
    आवक : 600
    कमीत कमी दर : 6900
    जास्तीत जास्त दर : 7151
    सर्वसाधारण दर : 7100
  • वरोरा-खांबाडा
    आवक : 501
    कमीत कमी दर : 7000
    जास्तीत जास्त दर : 7220
    सर्वसाधारण दर : 7100
हे पण पहा --  MCX Cotton live : नवीन कापूस बाजारात दाखल! तर कापूस वायदे ११ महिन्यातील उचांकी पातळीवर !

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment